प्रतिष्ठा न्यूज

जागतिक मातृभाषा दिनानिमित्त अक्षरयात्री प्रतिष्ठानचे नेपाळ- भारत बहुभाषिक विश्व संमेलन दिमाखात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय दूतावास नेपाळ व
अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक विश्वसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले .
त्यानिमित्ताने मराठी,नेपाळी,मैथिली, अवधी,संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, पंजाबी व इंग्रजी अशा १२ भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य श्री.ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे भारतीय दूतावासाच्या हॉलमध्ये संपन्न झाले.
भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आसावरी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
केले .कार्यक्रमासाठी
प्रमुख अतिथी म्हणून श्री .भूपाल राई,कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान,श्री बिमल कृष्ण श्रेष्ठ, उप कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान व डाॅ . गंगाप्रसाद अकेला, ज्येष्ठ साहित्यिक हे लाभले होते.अध्यक्षस्थान त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डाॅ .संजीता वर्मा यांनी भूषविले. नेपाळचे राजदूत श्रीवास्तव सर या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते .सह अध्यक्षा म्हणून २४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ .ज्योती कदम , नांदेड या उपस्थित होत्या . रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ . स्मिता पाटील यांनी भूषविले .
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉ .उर्मिला चाकूरकर, डॉ .स्वाती शिंदे -पवार श्री . अनिल पवार, प्रा . डॉ . प्रीती शिंदे – पाटील , आशा डांगे, डॉ .शुभा लोंढे यांनी केले .विशेष अतिथी म्हणून मनोज पाठक, प्रा.डॉ . विलास पाटील, श्री
. दिनकर जोशी , श्री . चंद्रशेखर पाटील उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांनी
पाठवलेला शुभसंदेश
सर्व रसिकांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला.भाषेचे राष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठे योगदान असते.भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक गहिरे करण्यासाठी सर्व साहित्यिक प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या डाॅ . स्वाती शिंदे पवार,श्री . अनिल पवार , प्रा . डॉ .प्रीती शिंदे -पाटील यांनी अक्षरयात्री प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी संमेलन काठमांडू येथे साजरे करून एक नवे पाऊल टाकले आहे.
या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती .
प्रत्येक भाषेतील कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या . वेगवेगळ्या बारा भाषेतील साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविल्याने इतर भाषेतील विचारांची आधार प्रदान यावेळी चांगल्या प्रकारे झाली .
जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाप्रमाणे मराठी भाषेचे साहित्यिक कार्यक्रम जगभर करण्याची भूमिका यावेळी डॉ .स्वाती शिंदे – पवार यांनी बोलून दाखविली.
त्रिभुवन विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठातील कुलपतींनी यावेळी मराठी साहित्यिकांना विद्यापीठांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले . भारतीय भाषेतील कवितांचा अनुवाद इतर भाषेमध्ये करणारी मंडळी या संमेलनातून पुढे आली . मराठी भाषेतील उत्कृष्ट कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली . नेपाळचे माजी राजदूत श्री . ठाकूर सर यांनी भारतीय साहित्यिकांना चहापानासाठी निमंत्रित केले .
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राजदूतावास नेपाळ आणि अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा यांनी केले होते . या कार्यक्रमासाठी डॉ . ज्ञानेश्वर मुळे माजी राजदूत व डॉ .आसावरी बापट यांनी खूप परिश्रम घेतले .
या एक दिवसीय साहित्य संमेलनानंतर भारतीय साहित्यिकांसाठी अक्षर यात्री प्रतिष्ठान व स्वराज हॉलिडेज विटाच्या संचालिका अमृता जाधव व रवी जाधव यांनी पर्यटन व्यवस्था अत्यंत उत्तम केली . साहित्यिकांच्या सत्कारांचे नियोजन अनुजा पाटील व संध्या धाट यांनी केले .
या संमेलनामुळे भारत नेपाळ मैत्रीचा पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी व्यक्त केला . यावेळी प्रा .डॉ . विलास पाटील परभणी यांनी बहिणबाई, डॉ .उर्मिला चाकूरकर पैठण यांनी विठोबा, डॉ . ज्योती कदम नांदेड यांनी आदिम जाणीव,श्री . मनोज पाठक बुलढाणा यांनी ए और वो ही हिंदी कविता सादर केली .,प्रा प्रीती शिंदे -पाटील वारणा
नगर यांनी माय मराठी ही कविता म्हणून रसिकांची चांगलीच पसंती मिळवली . श्री .दिनकर जोशी बीड यांनी सोन्याचा पिंपळ, डॉ .स्मिता पाटील मोहोळ यांनी तिचा ठाव, डॉ . शुभा लोंढे पुणे यांनी लगते है ही हिंदी ऊर्दू बहारदार गझल सादर करून भलतीच वाहवा मिळविली . आशा डांगे औरंगाबाद यांनी जत्रा, डॉ .स्वाती शिंदे -पवार यांनी साहित्यिक आहे मी एल्गार आहे ही कविता सादर केली . या संमेलनातील सर्वच कवी हे प्रतिथयश मान्यवर कवी असल्याने हे साहित्य संमेलन अधिक समृद्ध झाले .यावेळी अक्षरयात्री प्रतिष्ठानने विश्व संमेलनाच्या उचललेल्या पावलाचे मनापासून स्वागत व कौतुक करण्यात आले .
यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालय, वाल्मिकी विद्यापीठ, नेपाळ संस्कृत विश्व विद्यालय, अक्षरयात्री प्रतिष्ठान भारत,स्वामी विवेकानंद संस्था नेपाळ,राजदूतावास नेपाळ यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते .
या साहित्य संमेलनास नेपाळमधील सर्व मान्यवर लेखकांनी आपली उपस्थिती लावली होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.