प्रतिष्ठा न्यूज

अंतरविभागीय योगा स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय योगा स्पर्धाचे आयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.यामध्ये क्षितिजा सुहास पाटील (एम.ए.१)हिने द्वितीय क्रमांक मिळविला तर साक्षी दत्तात्रय म्हेत्रे (बी.एस.सी.भाग३) हिने सहावा क्रमांक मिळवला. त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे महाविद्यालयाचे रजिस्टर उपळावीकर प्रा.विनोद पाटील आदी उपस्थित होते तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे ,रामकृष्ण पटवर्धन, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.सुरेश कुंभार उपप्राचार्य आर.ए . कुलकर्णी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने व योगिता परमने, अशोक आंबोळे यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.