प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्र विकास सेनेच्या तासगाव क महांकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी प्रशांत केदार यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी राष्ट्र विकास सेनेत प्रवेश जाहीर प्रवेश केला आहे.राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांचे आदेशाने युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी प्रशांत केदार यांची निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांचे हस्ते देण्यात आले आहे.यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष केदार म्हणाले,तासगाव – कवठेमहकाळ तालुक्यातील सामाजिक प्रश्नावर आवाज उठवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्र विकास सेना करेल.तालुक्यात राष्ट्र विकास सेनेची  निश्चित लक्षणीय ताकत वाढेल.तसेच येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद,नगरपालिका,विधानसभा या सर्व निवडणुका राष्ट्र विकास सेना सर्व पातळीवर ताकतीने लढणार असल्याचे सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.