प्रतिष्ठा न्यूज

कै.माधवराव पाटील जाधव यांच्या स्मरणार्थ गोड जेवनाच्या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथील जेष्ठ नागरिक असलेले व ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले कै. माधवराव (बापू) गंगाराम पाटील जाधव (माजी सरपंच) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झाले होते.यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बहिणी, मुले, मुली व नाती नातवंडां तर्फे गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यानिमित्ताने त्यांनी कै.माधवराव पाटील यांची आठवण यावी म्हणुन विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असुन एक नवीन आदर्श उपक्रम राबविले आहे.
त्यावेळी गावातील हरिचंद्र पाटील जाधव, व्यंकट जाधव ( शिक्षक), संभाजी जाधव, गंगाधर पाटील, नारायण जाधव, व्यंकटराव पाटील जाधव, लक्ष्मण पाटील, शिवराज पाटील जाधव, बालाजी नावंदे
( एक्स आर्मी ), बालाजी जाधव, संतोष मोरे, माणिक लांडगे, गजानन शिंदे, विठ्ठल कदम, कुरें, गिरीश शिंदे, शरद लाब्दे, शुभम जाधव, ऋषिकेश जाधव, साई जाधव, आशिष जाधव, कृष्णा जाधव, ओमकार जाधव, रितेश जाधव, आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.