प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे महेश्वर हिंगमिरे यांची सहकार भारती सांगली (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार                                  तासगाव : सहकार भारतीच्या सांगली(ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी तासगावचे महेश्वर हिंगमिरे यांची निवड झाली आहे.सहकार भारती च्या कोल्हापुर विभागाचा अभ्यास वर्ग व प्रशिक्षण शिबीर महाबळेश्वर येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी श्री. हिंगमिरे यांच्या निवडीची घोषणा प्रदेश संघटन मंत्री संजय परमणे यांनी केली. श्री.महेश्वर हिंगमिरे हे तासगाव अर्बन को-ऑप बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी कोल्हापुर विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप,सहप्रमुख नरेंद्र गांधी, प्रदेश महिला सहप्रमुख सौ.अश्विनी आठवले,सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले,महामंत्री प्रा.आनंद शेलार,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जवाहर छाबडा,तासगाव अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी,सहकार भारतीचे  सांगली महानगर मंत्री शैलेश पवार,प्रचार व प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी आणि  सांगली, कोल्हापुर,सातारा येथील पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.