प्रतिष्ठा न्यूज

भाजपाचे कार्यकर्ते मजले, आवळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 27 : भाजपचे कार्यकर्ते अर्जुन मजले, शंकर आवळे व इतर काही भाजप कार्यकर्त्यांनी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस भवनमध्ये हा कार्यक्रम झाला.
भाजपमध्ये असलेली अंतर्गत खदखद आणि आणि पक्षातील हुकूमशाही प्रवृत्ती यामुळे त्यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
या पक्षप्रवेशाच्यावेळी अजित ढोले, सनी धोत्रे, शेवंता वाघमारे, अशोक मासाळ, पैगंबर शेख, आशिष चौधरी, अमित बस्तवडे, बाबगोंडा पाटील, राजेंद्र कांबळे, सुरेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.