प्रतिष्ठा न्यूज

श्री महाशक्ती मल्लिनाथ महाराज देवस्थानचा वार्षिक महोत्सवा निमित्ताने- वीर बाल दिवस साजरा: जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचा अभिनव उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : नांदेड तालुक्यातील मरळक येथील श्री महाशक्ती लिंग मल्लिनाथ देवस्थान चा 33 वा वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आला. सदगुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते 33वर्षा पूर्वी या ठिकाणी देवस्थानाची स्थापना झाली होती.
दि 24 डिसेंबर 2022 रोजी या देवस्थानाचा वार्षिक महोत्सवा निमित्त नवी दिल्ली येथील जय भारत माता सेवा समिती, शाखा नांदेडच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत श्री गोविंद गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे चार साहेब जादे सुपुत्र यांचा वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम राष्ट्रध्वज उभारून त्यास मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत घेण्यात आले. चार साहेब जादे यांच्या व गुरुगोविंद सिंग जी महाराज यांच्या प्रतिमेस सदगुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज व सचखंड गुरुद्वाराचे कथावाचक श्री निहार सिंगजी, श्री रणजीत सिंगजी कामठेकर, यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुरुवातीस जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दासराव हंबर्डे यांनी भारत माता सेवा समितीचे कार्य व उपक्रम याबद्दल माहिती देऊन प्रस्तावना केली. बसवेश्वर विद्यालय, कामठा ची विद्यार्थिनी कुमारी अंजली कल्याणकर हिने श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांचे चार पुत्रांच्या सनातन धर्म वाचण्यासाठी केलेल्या बलिदानाची विस्तृत माहिती सांगितले. त्यानंतर सचखंड गुरुद्वाराचे कथा वाचक श्री निहार सिंगजी यांनी सनातन धर्म वाचण्यासाठी व देशासाठी श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांनी केलेल्या त्यागाची व कार्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या चार पुत्रांनी देश धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली याचा संपूर्ण इतिहास भावीका समोर ठेवला.
सदर कार्यक्रमास जिंतूर येथील माणिक महाराज रेंगे जनाई अनाथाश्रम यांनी मल्लिनाथ बाबांचे देशा प्रति असलेल्या कार्याची व विचारांचे मांडणी केली. संविधान ने दिलेल्या मताचा अधिकार पैसे घेऊन अथवा देऊन बापर करू नका. यावेळी महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तस्मिन पटेल यांनी आपले विचार मांडले. तसेच यावेळी श्यामजी यांच्या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला, शेवटी श्री रणजीत सिंगजी कामठेकर गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव यांनी सदगुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांना आपल्या कामठा या गावी येण्यास निमंत्रित केल.सदर कार्यक्रमास नांदेड व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून व कर्नाटक राज्यातून हजारो भावीक भक्त व देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. शेवटी कार्यक्रमाची सांगता भारत माता की जय, वंदे मातरम मल्लिनाथ महाराज की जय.या जयघोषाने झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाशक्ती लिंग मल्लिनाथ देवस्थानचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, उपाध्यक्ष गंगाधरराव कदम, सचिव दामोदर शेट्टी, बालाजीराव कदम, बळीराम कदम, भिवाजी कदम, व्यंकटी कदम, तुकाराम कदम, शिवानंद कदम, मल्लिकार्जुन स्वामी, शेषराव दालपुसे, जयवंत शिंदे, ज्ञानू दालपुसे, गंगाधरराव धुमाळ, साईनाथ भोसीकर, श्रीमती पुष्पलता कापुरे, सुहास नांदेडकर, संतोष इंगळे, दत्तात्रय कुरुंदे, जिरोणकर, किसनराव पुणेगांवकर, दुलबाजी सायाळकर,प्रभू पाटील, रमेश पाटील, बंडू पाटील, सुधाकर रबडे, शंकर पाटील व परिसरातील अनेक भावी भक्तांनी सेवेकरानी सेवा केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.