प्रतिष्ठा न्यूज

तासगावचें कस्तुरबा रुग्णालय लवकरच सुरु होण्याचे संकेत…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालय गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून याबाबत अनेक संघटनांनी वेळोवेळी नगरपालिकेला निवेदन देऊन रुग्णालय चालू करणे बाबत विनंती केल्या होत्या.नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून कस्तुरबा रुग्णालय लवकर सुरू होण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न सुरू होते. खासदार संजय काका पाटील यांच्या पुढाकाराने तब्बल सहा कोटी तीस लाख निधी खर्च करून,हें मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आला आहे.दोन वर्षांपूर्वी याचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले आहे. 100 बेड,ऑक्सिजन प्लांटसह सर्व सुविधानि सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधून तयार आहे.परंतु लोकार्पण होऊन दोन वर्ष रुग्णालय धुळ खातं पडले आहे.याबाबत आज मिरज वैद्यकीय महाविद्यालय मार्फत कस्तुरबा रुग्णालय लवकरात लवकर चालू करणेबाबत खा.संजयकाका पाटील आणि नगरपालिका प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफसो यांची भेट घेतली.कोल्हापूर येथील विमानतळावर झालेल्या या भेटीत मंत्री मुश्रीफ यांनी सकारात्मक संकेत देवून अधिवेशनानंतर तात्काळ याबाबत बैठक घेण्याचे मान्य केले.त्यामुळे कस्तुरबा रुग्णालय लवकरच सुरु होऊन तासगाव करांची प्रतीक्षा संपणार असे दिसत आहे.यावेळी तासगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर  उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.