प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट डी. एड. कॉलेजचीविद्यार्थीनी माहिम वजीर हिचे सीटीईटी परीक्षेत घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट डी. एड. कॉलेज, मिरज येथील द्वितीय वर्षात शिकत असलेली प्रशिक्षणार्थी कु. माहीन करीमखान वजीर हीने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यामार्फत ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीटीईटी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील व विश्वस्त मा. विरेंद्रसिंह पाटील यांनी माहीनचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु. माहिनचा संस्थेच्या वतीने श्री. सतिश पाटील, कॅम्पस कोऑर्डीनेटर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बिभीषण कराळे म्हणाले की, कु. माहिन हिने या यशासाठी अथक प्रयत्न केले तिला श्रीमती. अस्मिता कोडग, स्व. श्रीमती रेजुला मॅडम व रफिक तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. या सत्कार समारंभावेळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील विविध शाखांचे प्राचार्य, अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.