प्रतिष्ठा न्यूज

10 रुपयांचे नाणे अधिकृत: जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी बँकांनी व्यवहार करण्यासाठी जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – मा.जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आलेल्या माहिती नुसार नांदेड जिल्ह्यातील काही बँक शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका 10 रुपयांचे नाणे व्यवहार करण्या साठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तर काही ठिकाणी दुकानदार व जनता (नागरिक) 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नाण्यांच्या खरेपणा विषयी शंका येत असंल्याने हयगय करीत आहेत. भारतीय रिझर्व बैंक टाकसाळीत तयार केलेली नाणीच प्रसृत करते व ह्या टाकसाळी भारत सरकारच्याच अधिकाराखाली असतात ह्या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात.
नाण्यांचे आयुष्य दीर्घकालीन असल्याने, निरनिराळ्या डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात रिझर्व बँकेने आतापर्यंत 14 डिझाईन्स मध्ये 10 रुपयांची नाणी दिली असून, त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनांमार्फत कळविण्यातही आले आहे ही सर्व नाणी वैध चलन असून ती व्यवहारांमध्ये स्वीकारता येऊ शकतात.
भारतीय रिझर्व बँकेने वृत्तपत्र निवेदन (नोव्हेंबर 20, 2016) देऊन, रुपये 10 मूल्याची नाणी सर्व व्यवहारांमध्ये कोणतीही हयगय न करता वैध चलन म्हणून स्वीकारण्याची विनंती जनतेला केली होती.
तेंव्हा जिल्ह्यातील सर्व बँका व नागरिक (जनतेस) आपणास याद्वारे कळविण्यात येते की 10 रुपये  नाण्यांच्या वापरा बाबतचा गैरसमज दूर व्हावा व व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, त्यासाठी बँकांनी शाखेच्या बाहेर बॅनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरून जनजागृती, करून बँकांच्या ग्रामीण भागातील यंत्रणांचा पुरेपुर वापर करून जनता (नागरिका) पर्यंत
आरबीआय (RBI) च्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले 10 रुपयांचे नाणे न स्विकारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणारा व्यक्ती कारवाईस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी- मा.अभिजित राऊत नांदेड यांनी केले आहे .
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.