प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय,ज्युनियर काॅलेज मध्ये कै.डॉ.जे.जी.वाडेकर यांची जयंती उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ.जनार्दन गणपतराव वाडेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांची जयंती दि.14 आॅक्टोबर रोजी उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाचे मार्गदर्शक,संस्थाचाल श्री चंद्रकांत सोनवणे, मु.अ.श्री बी .एम. हंगरगे यांच्या हस्ते स्वर्गीय डॉ. वाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कै.डाॅ.वाडेकर यांना अभिवादन केले.
याप्रसंगी उप मुख्याध्यापक डॉ.पांडूरंग यमलवाड, पर्यवेक्षक सावंत , नागनाथ केंद्रे आनंद मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख टापरे, ग्रंथालय विभाग प्रमुख श्री सोनाजी वाडेकर, क्रीडा शिक्षक श्री टी.एन.रामनबैनवाड एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.एम.एम.गाडेकर, श्री आर .एच.कदम, श्री रत्नाकर कोत्तापल्ले, कस्तूरबा गांधी विद्यालयाचे मु.अ.श्री सुर्यकांत टापरे,श्री बी.डी. देशमुख सर तसेच श्रीमती जायेभाये,श्रीमती खुळे,श्रीमती पावसे मॅडम, यांच्यासह सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.