प्रतिष्ठा न्यूज

टीका करणाऱ्यांची कुवत आहे का? – खा.संजय काका पाटील : आबांच्या पश्चात कारभाऱ्यांनी गलथान कारभार केला

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव बाजार समितीत शेतकर्‍यांचे कोणतेही हीत जोपासले जात नाही.बेदाणा सौद्यावेळी उधळणीच्या माध्यमातून 3 ते 4 किलो तूट येते.त्यामध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते.व्यापारी व बाजार समितीकडून शेतकर्‍यांचे शोषण केले जाते,असा आरोप खासदार संजय काका पाटील यांनी केला,शिवाय द्राक्ष उत्पादकांची दरवर्षी होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे,असे आश्‍वासनही खा. पाटील यांनी दिले.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रताप पाटील,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रदीप माने,आर. डी.पाटील,सुनिल जाधव,प्रमोद शेंडगे, हणमंत पाटील,स्वप्नील पाटील, माणिक जाधव,महेश पाटील, अविनाश पाटील यांच्यासह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार म्हणाले तासगाव बाजार समितीत बेदाणा सौद्यावेळी शेतकर्‍यांचे शोषण होते बेदाण्याची उधळण करुन 3 ते 4 किलो तूट होते. शिवाय बेदाणा वॉशिंगवेळीही तूट दाखवली जाते,अशा आमच्याकडे तक्रारी आहेत.बाजार समितीचा उद्देश बाजूला ठेवून शेतकर्‍यांचे शोषण केले जाते.ही तूट कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.शिवाय बेदाण्याचे पैसे 41 दिवसांत मिळतात, ते 15 दिवसांत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.सद्दस्थितीत बेदाणा सौद्यावेळी शेतकर्‍यांना लुबाडले जाते.जर पैसे लवकर पाहिजे असतील तर शेतकर्‍यांना व्यापारी व्याजाने पैसे देत आहेत.व्यापार्‍यांनी कोट्यवधी रुपये शेतकर्‍यांना व्याजाने दिले आहेत.शिवाय बेदाणा सौद्यावेळी काही व्यापार्‍यांना जाणीवपूर्वक जादा वेळ दिला जात आहे.व्यापार्‍यांचे हीत जोपासण्यासाठी हे केले जात आहे. मात्र आम्ही हे सगळं मोडून काढू.
खा.पाटील म्हणाले तासगाव बाजार समितीच्या नूतन इमारतीचे अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करणार आहोत.त्यासाठी नवीन उद्योजकांना या ठिकाणी संधी देणार आहोत.स्व. आर. आर. पाटील यांनी ही बाजार समिती उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पश्‍चात बाजार समितीतील ‘कारभारी’ शेतकर्‍यांचे हीत पाहत नाहीत.याठिकाणी सगळा गलथान कारभार दिसून येत आहे. भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे लेखापरिक्षणात समोर आले आहेत.
सत्ताधार्‍यांचा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी आम्ही भूमिका घेतली आहे.शेतकर्‍यांसाठी बाजार समिती दुवा म्हणून काम करेल.सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांसाठी भोजनालय, विश्रांतीगृह,स्वच्छतागृह उभारण्याची घोषणा केली होती.मात्र यातील काहीही झाले नाही.मात्र यापुढील काळात नाबार्डच्या माध्यमातून बाजार समितीसाठी पैसे आणू.खा.पाटील म्हणाले, द्राक्षबागायतदारांची ङ्गसवणूक वाढत आहे.व्यापारी शेतकर्‍यांना गंडवत आहेत.ही फसवणूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकां सोबत बैठक झाली आहे.पोलीस – महसूल – कृषी विभाग व बाजार समितीच्या माध्यमातून ही फसवणूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखणार आहे.विरोधकांच्या विविध टीकांना उत्तर देताना खा. पाटील म्हणाले, टीका करणार्‍यांची कुवत काय आहे,त्यांचे अज्ञान दिसून येत आहे,त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे.वेळ आल्यावर त्यांच्याकडे बघू. आता मला टीका – टिप्पणीत वेळ घालवायचा नाही.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.