प्रतिष्ठा न्यूज

कोल्हापूर येथे नॅचरोपॅथी कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२३ :भारतीय निसर्गोपचार संस्था आयुष मंत्रालय पुणे व आत्मसहाय्य सामाजिक संस्था शाखा कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये नॅचरोपॅथी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन होमिओपॅथी तज्ञ डॉ.प्रकाश शिंदे यांच्या हस्ते रोपांना पाणी घालून करण्यात आले.
भारतीय निसर्गोपचार संस्था आयुष मंत्रालय पुणे येथील डॉ. परेश वाडकर प्रमुख वक्ते होते.ते म्हणाले, ” माणसाचे शरीर हे पंचतत्वाने बनले असून आकाश, वायू, सूर्य म्हणजेच अग्नी, जल व पृथ्वी यांनी बनले आहे. याचे समतोल प्रमाण ठेवले की प्रकृती चांगली राहते. अन्यथा बिघडते म्हणून उत्तम आरोग्यासाठी निसर्गाशी जवळीक करा. ”
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख आत्मसहाय्य संस्था, कोल्हापूर च्या कोषाध्यक्ष दीप्ती कदम यांनी करून दिली. तर पाहुण्यांचे स्वागत अध्यक्षा मनीषा जाधव व सचिव अशोक पोतनीस यांनी केले.संस्थेच्या कार्याचा आढावा मनीषा जाधव यांनी घेतला. तर सचिव अशोक पोतनीस यांनी ” विद्यार्थी व पालक यांनी चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा संदेश दिला. व ‘चेहरा ठेवा हसरा भय सारे विसरा’ हे आपले घोषवाक्य असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश शिंदे यांनी संगणक युगात निसर्गाशी दुर्लक्ष न करता संवाद साधा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका वर्षा देशपांडे यांनी केले, तर आभार अशोक पोतनीस यांनी मानले. यावेळी शाळेच्या शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.