प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकरत्न व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा कल्याणमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न

प्रतिष्ठा न्युज
कल्याणश्री :महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांगीण विकास विचार सामाजिक संस्था आणि मुख्याध्यापक सन्मा.श्री.अविनाश सोनावणे सर यांनी१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिक्षकरत्न आणि साहित्यरत्न या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते कल्याण येथील अचिवर्स स्कूल आणि काॅलेज येथे हा सोहळा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी सन्मा. श्री विजय सरकाटे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिक्षक आमदार सन्मा. डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे , साहित्यिक सन्मा.श्री एकनाथ आव्हाड, सन्मा.अशोक ठाणगे संचालक,ठाणे /पालघर प्राथ. शिक्षक पतपेढी,सन्मा.श्री.दिनेश चौधरी ज्येष्ठ अधिव्याख्याता ठाणे,सन्मा डाॅ‌.महेश भिवंडीकर,सन्मा. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका डॉक्टर आनंदराव सूर्यवंशी सर इ.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या वेळी मुख्याध्यापक मा .श्री.अविनाश सोनवणे सरांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षक आमदार मा.श्री.एकनाथ आव्हाड आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडले.यावेळी ठाणे जिल्ह्यातील एकूण ४०जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकरत्न हा पुरस्कार आदर्श शिक्षकांना दिला गेला तसेच समाजातील समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या साहित्यिक यांना साहित्यरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने झाली.यावेळी सन्मा.शिक्षक आमदार यांनी आपण सर्वजण आजपासून या गीताला राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देऊ‌,असे सांगून उभे राहून या गीताचे गायन केले ‌.अशा या अनोख्या सोहळ्यात कल्याणच्या प्रसिद्ध लेखिका/कवयित्री/ शब्दसुमने साहित्यिक मंच च्या अध्यक्षा,स़ंस्थापिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, महाराष्ट्र ‌यांच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष. श्रीमती अनिता प्रविण कळसकर यांना बालसाहित्यिक, सुप्रसिद्ध कवी,कथाकथनकार मा‌.श्री एकनाथ आव्हाड यांचे हस्ते साहित्यरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले.सर्व साहित्यिक जगतात अनिता कळसकर यांचेवर अभिनंदन चा वर्षाव होत आहे . समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विशेष ओळख या पुरस्काराने मिळाली. खरोखरच कार्यक्रम अतिशय सुंदर आणि आटोपशीर झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन .श्री अर्जुन उगलमुगले सरांनी अगदी ओघवत्या शब्दांत केले.तसेच मा.पालवे सरांनी प्रत्येक शिक्षक आणि साहित्यिक यांना पुरस्कार प्रदान होत असताना काही शब्दांत सर्वांची ओळख खूप छान पद्धतीने करून दिली. शेवटी सर्वांचे परत एकदा अभिनंदन करून आपली लेखणी बळकट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.