प्रतिष्ठा न्यूज

गोळेगाव येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेचे दहन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील गोळेगाव (त) येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या विधानाचा निषेध करत महाविकास आघाडीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन राज्यपाल कोश्यारी यांनी काढलेल्या अपशब्द विधानाच्या निषेधार्थ  घोषणा देत सोमवार दि 21 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 5:30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील ढाले, काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास पाटील ढाले, राजू लोहकरे, पंडित कपाळे, भाऊसाहेब मुरुड, शंकर कपाळे, विठ्ठल शिंदे, विजय जोगदंड, सुनील तारू, बालाजी शिराळे, भुजंग ढाले, प्रकाश तारू आदीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.