प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या जायंट्स ग्रुप ऑफ अस्मिता सहेलीने दिव्यांग मुलांनसोबत साजरा केला बालदीन

 प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:14 नोव्हेंबर पंडित जवाहलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो,नेहरूंना मुले खूप आवडायची त्यामुळे हा दिवस सुद्धा मुलांच्या समवेत साजरा करणे अस्मिता सहेलीला योग्य वाटले म्हणूनच अस्मिता सहेलीने तासगावच्या वरचे गल्ली येथील आधार शिक्षण संस्था संचलित दिव्यांग मुला मुलींच्या शाळेमध्ये बालदिन साजरा केला.या दिवसाचे औचित्य साधून तेथील 60 दिव्यांग मुलांसाठी नॅपकिन्स तसेच खाऊ वाटप व नवनिर्वाचित खोल्यांसाठी गरजू असे साहित्य देण्यात आले.यावेळी अध्यक्षा अर्चना कुलकर्णी तसेच ग्रुपच्या सदस्य या सर्वांनी मिळून त्या मुलांच्या समवेत हास्याचे प्रयोग सादर केले,यामध्ये मुले खूप रंगली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी सरांनी केले मार्गदर्शन उपाध्यक्ष किरण हंचनाळकर यांनी केले.आभार शिक्षण संस्थेच्या मॅडम यांनी मानले.अशा मुलांच्या समवेत हा 14 नोव्हेंबर बालदिन साजरा केला यासाठी विशेष सहकार्य अध्यक्षा अर्चना कुलकर्णी यांच्या कन्या डॉ अमृता नाईक यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुप ऑफ अस्मिता सहेलीच्या अध्यक्ष अर्चना कुलकर्णी,उपाध्यक्ष किरण हंचनालकर,खजिनदार अर्चना जोग, जनसंपर्क अधिकारी सुनीता चिपाडे, सदस्या नित्या शहा,उज्वला शहा, मंगला इनामदार तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते जवळपास 60 विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.