प्रतिष्ठा न्यूज

ठेकेदारांनी सांगली मनपा विकत घेतलेली नाही : पृथ्वीराज पवार ; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी  : सांगली महापालिकेचा कारभार कंत्राटदारांच्या हितासाठी चालवला जातो आहे का ? . तो थांबवा. कंत्राटी कामागारांना वाऱ्यावर सोडाल तर खबरदार. त्यांना सन्मानाने कामावर हजर करून घ्या. त्यांच्याकडून बेकायदेशीर वसूली बंद करा, अन्यथा कुणालाच सोडणार नाही, त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी आज दिला*
*कंत्राटी कामगारांना मनमानी पद्धतीने कामावरून कमी केले जात आहे. त्यांच्या पगारातून बेकायदेशीर वसुली केली जात आहे. या मुलांना धमकावले जात आहे, असा आरोप करत आज पृथ्वीराज पवार यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरु केले. महापालिका अतीरीक्त आयुक्त अडसुळसो व उपायुक्त वैभव साबळे साहेब यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊन आवाहन केले. गांधीगिरी पद्धतीने बदल झाला नाही तर* शहीद*भगतसिंगांच्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल. या तरुणांनी तुमच्या वाहनाखाली किंवा* *महापालिकेचा छतावरुन उड्या घेतल्या आणि काही बरेवाईट झाले तर जबाबदारी तुमची असेल, असा इशारा त्यांनी दिला*.
*ते म्हणाले, की ठेकेदारांनी तरुण बेरोजगारांच्या आयुष्याशी खेळ सुरु केल आहे. वाटेल तेंव्हा कामावर घेणार, पगारातून वसुली करणार, पैसे दिले नाहीत तर कामावरून काढून टाकणार, ही सरंजामशाही सुरु आहे. महापालिकेने ठेका दिलाय, सांगली विकलेली नाही.*
या तरुणांच्या आयुष्याशी खेळ करू नका. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या. सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा. पूर्वी पगारातून पाच हजार रुपये कपात केली जात होती, ती आता नऊ हजारावर पोहचली आहे. बेकायदेशीर लाखो रुपये अनामत म्हणून उकळले जात आहे.
ठेकेदाराने आता हा प्रकार तातडीने थांबवावा. परवडत नसेल तर ठेका सोडावा, महापालिका त्याचे बघेल. नियमबाह्य पद्धतीने नऊ वर्षासाठी ठेका घेतला म्हणजे मनमानीला मोकळे रान मिळाले असे समजू नये.दोन दिवसांत हे घडले नाही तर सर्व कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि शेकडो सुज्ञ नागरिकांना घेऊन मनपासमोर बेमुदत उपोषण सुरु करू.
शिवाजी लोंढे, बाळासाहेब कोळी, संदीप आवळे, उदय मुळे, महादेव शेडगे, प्रथमेशमुळे, किशोर हेगडे, सतीश जाधव हरीपुर,यावेळी उपस्थित होते.*

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.