प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये, प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, मिरजेतील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक, अनेक बँकांचे मूल्यनिर्धारक ( व्हॅल्युअर ) तसेच सांगली जिल्हा शाखा कार्यवाह राजेश गजानन देशमाने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या उपप्राचार्या  अंजना कोळी यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
      या कार्यक्रमांमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचा अविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, देशभक्तीपर गीत, गायन, नृत्य सादर केले. संगीताच्या सुमधुर तालावर योगा व जुदोची झालेली प्रात्यक्षिके हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
      प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना, आपली भारतीय संस्कृती किती गौरवशाली आहे हे प्रभू श्रीरामाचे उदाहरण देऊन पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांची जोपासना करून  देशाच्या प्रगतीचा पाया रोवावा असा संदेशही दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अंगी असणाऱ्या कलागुणांचा विकास करावा असे मार्गदर्शनही केले.
      याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा ) देशमुख, उपाध्यक्ष डॉ.प्रसाद केळकर व सचिव  सुरेंद्र चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या प्राचार्या  इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी यांनी ही प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती कोरे यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, उत्साहित पालक वर्ग, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.