प्रतिष्ठा न्यूज

माळेगाव यात्रेसाठी संकेतस्थळाची निर्मिती- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेसंदर्भात इत्यंभूत माहिती

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री खंडोबाची यात्रा येत्या 10 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पहिल्यांदाच माळेगाव यात्रेसंदर्भात संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेची इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी- मा. मीनल करनवाल यांनी दिली आहे.दि.10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये माळेगाव येथे यात्रा भरणार आहे. यानिमित्त भाविकांना यात्रेत विविध सुविधा प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी माळेगाव यात्रा संबंधाने मुख्य कार्यकारी-मा. अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली असे संकेत स्थळाचे नाव- http://malegaonyatra.ceozpnanded असून या संकेत स्थळावर माळेगाव यात्रेची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये माळेगाव यात्रेत देण्यात आलेल्या सुविधा, नागरिकांनी माळेगावात कसे यावे, आपत्कालीन संपर्क नंबर, लाईव्ह दिशादर्शकही यात देण्यात आले आहेत. संपूर्ण माळेगाव यात्रेचा नकाशा, माळेगाव यात्रेतील कार्यक्रम, कला महोत्सवाच्या ठिकाण, मंदिराचे ठिकाण, कुस्त्याचे मैदान, कृषी व पशुप्रदर्शन, शौचालयाचे ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिथे आपल्याला जायचे आहे त्याठिकाण संकेत स्थळावरील मॅपच्या मदतीने भाविकांना जाता येणार आहे. अशा पद्धतीने या संकेत स्थळाचा फायदा होणार आहे. तसेच या वेबसाईटवर मंदिर स्थळदर्शक नकाशा, यात्रेची पंरपरा व इतिहासाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी- मा.मीनल करनवाल यांचे संदेश तसेच माळेगाव यात्रेचे फोटो गॅलरी देखील या संकेत स्थळावर राहणार आहे. यात्रे दरम्यानचे विविध कार्यक्रमांच्या फोटोसह हे संकेत स्थळ यात्रा कालावधीत वेळोवेळी अपडेट येणार आहे. नागरिकांनी सदर संकेत स्थळाला भेट देऊन यात्रे संदर्भातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी- मा. मीनल करनवाल यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.