प्रतिष्ठा न्यूज

डॉक्टर्स डे निमित्त डॉ. मनोहर मोदी यांचा मानपत्र देऊन सत्कार

प्रतिष्ठा न्यूज 
जत प्रतिनिधी :  डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने दुष्काळी भागातील व जत तालुक्यातील पहिले सर्जन डॉ. मनोहर शिवाप्पा मोदी #Manohar Modi यांचा मानपत्र देऊन व सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉक्टर म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.  आयुष्यामध्ये कोणीही डॉक्टरकडे गेला नाही, असा एकही माणूस सापडणार नाही. त्यामुळे डॉक्टरचे महत्त्व समाजात आहे. जतमधील सर्वात जुने प्रसिध्द सर्जन म्हणुन ओळखले जाणारे डॉ. मनोहर मोदी हे आजही आपल्या ७८ व्या वर्षीही डॉक्टरी व्यवसाय करीत आहेत. तसेच ते रुग्णांना चांगले उपचार करीत असल्याबद्दल प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. रोहन मोदी, सौ.रिया मोदी, डॉ. रोहिणी नाईक, रविराज खांडेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, उत्तम चव्हाण, प्रा. हेमंत चौगुले, योगेश व्हनमाने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.