प्रतिष्ठा न्यूज

जिवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा ता. २९ : गेले आठवडाभर मुसळधार पावसाने तालुक्याला  झोडपले आहे. ठिकठिकाणी पाणी आल्याने गगनबावडा कोल्हापूर महामार्ग वाहतुकीसाठी आठ दिवस बंद आहे.
मुसळधार पावसामुळे व वादळी  वा-यामुळे गेले ४ ते ५ दिवस  पंचक्रोशीतील अनेक गावामध्ये विज प्रवाह खंडित झाला होता. वीजे अभावी गावातील पिण्याच्या पाण्याचा पंप, दळपाच्या गिरणी, मुलांचा अभ्यास, संदेशवहन उपकरणे आदी गैरसोई झाल्या होत्या. अशावेळी महावितरणच्या  कर्मचाऱ्यांनी अडचणींची पर्वा न करता  आपला जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून  जावून खंडित वीज प्रवाह सुरळीत केला, व आपल्या चांगल्या व कर्तव्यदक्षतेचा ठसा उमटवला.                                         गगनबावडा तालुक्यातील शाखा अभियंता कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन व त्यांचे सर्व जनमित्र यांनी  शुक्रवार दिनांक. २६.७.२०२४ रोजी ७ वाजेपर्यंत स्वताच्या जिवाची पर्वा न करता  पर्यंत विद्युत प्रवाह चालू सुरळीत केला.
मुसळधार पाऊस व महापूरातून  आडचणीच्या ठिकाणी बोटीतून जावून लोकांना वीज प्रवाह चालू करून दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे पंचक्रोशीत कौतूक होत आहे. यात सहभागी झालेले  निवडे चे शाखा अभियंता अर्थव कोळी, मदतनीस  अमोल मोरे, रविंद्र पोतदार , रोहित मडवी ,भरत पाटील , बबलू पाटील , विश्वास डाकवे , प्रथमेश वापिलकर ,प्रकाश शिपेकर यांनी अविश्रांत परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.