प्रतिष्ठा न्यूज

पोलीस पाटील पदभरतीसाठी 27 फेंब्रुवारी पर्यंत अर्ज करा : मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी दि. 20 : मिरज उपविभागामधील मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील एकूण 40 गावातील रिक्त असलेली 40 पोलीस पाटील पदे आरक्षणाप्रमाणे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय येथे दि. 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन पोलीस पाटील निवड समिती अध्यक्ष तथा मिरज उपविभाग मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी केले आहे.

तालुका व गावनिहाय भरण्यात येणारी रिक्त असलेली पोलीस पाटील पदे व कंसात आरक्षण पुढीलप्रमाणे.  ‍मिरज तालुका – इनामधामणी  (अनुसूचित जमाती), कवलापूर (इतर मागास प्रवर्ग), कावजी खोतवाडी (खुला), कळंबी (इतर मागास प्रवर्ग), कानडवाडी (अनुसूचित जाती), आरग (अनुसूचित जमाती), पद्माळे (अनुसूचित जमाती), शिंदेवाडी (इतर मागास प्रवर्ग), कदमवाडी (इतर मागास प्रवर्ग महिला), मानमोडी (खुला), नावरसवाडी (ईडब्ल्युएस), जुनी धामणी (विशेष मागास वर्ग),  निलजी (अनुसूचित जाती).

तासगाव तालुका – कवठेएकंद (अनुसूचित जमाती महिला), चिंचणी (अनुसूचित जमाती), नागावनिमणी (अनुसूचित जमाती), वासुंबे (अनुसूचित जमाती), बेंद्री (इतर मागास प्रवर्ग महिला), लिंब (विमुक्त जाती अ), शिरगाव कवठे (अनुसूचित जाती महिला), खुजगाव (अनुसूचित जमाती), जरंडी (खुला), मोराळे पेड (खुला महिला), बलगवडे (अनुसूचित जमाती महिला), वाघापूर (अनुसूचित जमाती), निंबळक (अनुसूचित जमाती), बिरणवाडी (खुला महिला), भैरववाडी (खुला), किंदरवाडी (ईडब्ल्युएस), नागेवाडी (अनुसूचित जमाती महिला).

कवठेमहांकाळ तालुका – शिरढोण (ईडल्ब्युएस), कुची (भटक्या जमाती व महिला), जाखापूर (अनुसूचित जाती), कुंडलापूर (अनुसूचित जाती महिला), मोघमवाडी (अनुसूचित जमाती महिला), कोकळे (भटक्या जमाती ब), विठुरायाचीवाडी (भटक्या जमाती ब), शेळकेवाडी (ईडब्ल्युएस महिला), बसाप्पाचीवाडी (इतर मागास प्रवर्ग), मोरगाव (इतर मागास प्रवर्ग).

अटी पूर्ण करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांनीच विहीत मुदतीत अर्ज करावेत. अर्ज तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कर्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत. अर्जासाठी उमेदवारांना 100 रूपये इतके शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी सबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.