प्रतिष्ठा न्यूज

अर्धापुर तालुक्यातील कोंढ्याची रेवा जोगदंड अमेरिकेत एअरफोर्स फ्लाईट कमांडरपदी !

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येने अटकेपार झेंडा रोवला आहे. लेक रेवा दिलीप जोगदंड हिने आकाश भरारी घेत अमेरिकेत नेव्हल एअरफोर्स फ्लाईट कमांडर पदाला गवसणी घातली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी येथील कन्येने अमेरिकेत विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. याच जिगरबाज लेकीने अर्थात रेवा जोगदंड हिने तिच्या कर्तबगारीने आता अमेरिकेत एअरफोर्समध्ये फ्लाईट कमांडर पदाला गवसणी घातली आहे. गत दोन वर्षापासून तिने यासाठी अथक परिश्रम घेतले होते. या पदासाठी 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 26 जणांची निवड झाली, त्यापैकी एकमेव रेवा जोगदंड ची फ्लाईट कमांडर पदावर वर्णी लागली आहे.
या मुलीने सातासमुद्रापार डंका वाजवत अमेरिकेत देशाचे, राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे,गावाचे, नाव मोठे आहे.
कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे 9 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोलेड दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा प्रभाव त्यांची मुलगी रेवा जोगदंड हिच्या बालमनावर पडला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरु केली. आणि हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
रेवा दिलीप जोगदंड हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार करत अमेरिकेत कमांडर पदाला गवसणी घातली असल्याने ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. “एक गाव एक लग्न तिथी” या उपक्रमाचा येथे दरवर्षी अवलंब केला जातो. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सातत नवनवीन प्रयोग केले जातात. येथील नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करुन नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांने आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता रेवाने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केल्याने कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.