प्रतिष्ठा न्यूज

प्रा. शरद पाटील आदर्श शिक्षण संस्था चालक : रावसाहेब पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.३० : सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्याध्यक्ष व खासगी शिक्षण संस्थांचे मार्गदर्शक माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने एक आदर्श शिक्षण संस्था चालक काळाने हिरावून नेला.. यामुळे शिक्षण क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते खासगी शिक्षण संस्थांच्या समस्यावर रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी व्हायचे.. शिक्षण क्षेत्र समस्यामुक्त झाल्याशिवाय बहुजन समाजाचे शिक्षण सुरळीत चालणार नाही. शासनाने शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजेत. शिक्षण संस्थांनीही पारदर्शक कारभार करावा असे परखडपणे ते बोलत असत. असे भावपूर्ण उद्गार शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी काढले. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते.

स्व. प्रा. शरद पाटील सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रा. आर. एस. चोपडे यांनी प्रा. पाटील यांचा गोरगरीब जनतेला मोठा आधार होता. संस्थांच्या अडचणी ते समजावून घेत. त्यांच्या निधनाने आमचा अभ्यासू मार्गदर्शक हरपला असे सांगितले. प्रा. एम. एस. रजपूत यांनी प्रा. शरद पाटील हे धर्मनिरपेक्ष होते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांची हातोटी होती असे सांगितले. वैभव गुरव यांनी प्रा. पाटील हे शिक्षण संस्था चालकांना मदत करायचे.. ते या भागातील आपले लोक मुंबईत गेल्यावर खूप काळजीपूर्वक सहकार्य करायचे असे सांगितले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी, प्रा. शरद पाटील कार्यकर्ते जपायचे.. कायम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे रहायचे. कोणावरही अन्याय होऊ देत नसत. प्रसंगी शिक्षण संस्था चालकांनाही खडे बोल सुनावले आहेत. वापरा आणि फेकून द्या ही निती त्यांनी कधीच अवलंबली नाही. ते माणसाची प्रतिष्ठा जपायचे असे उद्गार काढले. यावेळी रावसाहेब पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. शिवपुत्र आरबोळे, विनोद पाटोळे, प्रा. एम. एस. रजपूत व शिक्षण संस्था चालक शोकसभेत उपस्थित होते. दोन मिनिटे स्तब्धता पाळून प्रा. शरद पाटील यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.