प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्यात मेंढपाळांच्या मेंढ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कोल्हापूर,आटपाडी,माण, तसेच कर्नाटकच्या सीमा भागातून मेंढपाळ उपजीविकेसाठी व आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच पशुधन जगवण्यासाठी मेंढ्या चराई करणेस तासगाव तालुक्यामध्ये येत असतात. यावेळी खतासाठी मेंढ्या शेतकऱ्यांच्या शेतात बसवल्या जातात.परंतु गेल्या चार दिवसां पासुन रात्रीच्या वेळी मेंढपाळांच्या तळावरती मेंढ्या चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.गेल्या चार दिवसांमध्ये सुखदेव आप्पा पडळकर,बाळेवाडी यांच्या दोन मेंढ्या व भारत आबा पडळकर आटपाडी यांच्या दोन मेंढ्या व इतर मेंढपाळांच्या दहा मेंढ्या कवठे एकंद, मनेराजुरी,मतकुणकी,वासुंबे,चिंचणी परिसरातून चोरीस गेल्या आहेत. चोरांच्या त्रासाला कंटाळून मेंढपाळ व मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीने तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारी थोरबोले यांना निवेदन देण्यात आले आहे.पंधरा दिवसाचे आत चोरांचा बंदोबस्त केला जावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मेंढपाळ आर्मी संघटनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन थोरात यांनी दिला आहे.यावेळी मेंढपाळ आर्मी संघटनेचे राष्ट्रीय संघटक राहुल हजारे संघटनेचे प्रचारक अजय शिंदे,रघुनाथ शेळके,अशोक पुकळे,तातोबा कोळेकर,जगन्नाथ कोळेकर,नाना पडळकर,दत्ता कोळपे,नामदेव सातपुते,भारत पडळकर,सुखदेव पडळकर,प्रकाश पुकळे,दादा कोळेकर,दिलीप कोळेकर,आप्पा कोळेकर,संदीप कोळेकर,सागर पडळकर,यांच्यासह मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.