प्रतिष्ठा न्यूज

मराठा महिला उपोषणस्थळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या यावे या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी दि. 29 सप्टेंबर 2023 पासून करण्यात आलेल्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे समस्त महिला भगिनी व सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. सदरील साखळी उपोषण स्थळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दि.2 ऑक्टोबर रोजी भेट देऊन.उपोषणकर्त्यांशी आरक्षण संदर्भात सखोल चर्चा केली. यावेळी माजी आ. अमर राजुरकर, रेखाताई पाटील चव्हाण, जयश्री पावडे, संगीता डक, विठ्ठल पावडे, आदीसह अनेकांची उपस्थिती होती, या पूर्वी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठूभाऊ चव्हाण व इतर समाज बांधवांनी भेट देऊन आपला सहभाग घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.