प्रतिष्ठा न्यूज

‘आपल्या कर्तृत्वाची मोहर समाजात उमटवा’ -विठ्ठल मोहिते

प्रतिष्ठा न्यूज
सांगली- दि. ४ : वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे १ मे ते २१ मे यादरम्यान २७ वे निवासी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबीर सुरू आहे.शिबिरामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, ठाणे जिल्ह्यातील ८ ते १६ वयोगटातील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
याप्रसंगी शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम, ऑलम्पिकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव, साने गुरुजी, एव्हरेस्टवीर अरुनिमा सिन्हा, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, आकाशकन्या कल्पना चावला, पहिल्या महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल या सर्वांचा इतिहास व त्यांच्या कार्यकर्तृत्वच्या रोमांचक गोष्टी सांगितल्या.
ते म्हणाले,’जीवन सुंदर आहे आपण ते आणखी सुंदर करू शकतो. सकस आहार,विहार,व्यायाम आणि वाचनाने आपलं व्यक्तिमत्त्व छसर्वांगसुंदर बनवू शकतो. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं तर ते स्वप्न सत्यात उरतेच. आपलं वागणं,बोलणं,चरित्र हीच आपली ओळख असते. पद, पैशापेक्षा नैतिकतेचे श्रेष्ठत्व हे नेहमी अधिक श्रेष्ठ दर्जाचे असते.जीवनात सदैव उत्तमतेचा ध्यास धरून;आपल्या कर्तृत्वची मोहर समाजात उमटवा.”
असे मोलाचे मार्गदर्शन विठ्ठल मोहिते यांनी शिबिरातील नवोदित मल्लांना केले.
यावेळी वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून, पैलवान राम नलावडे यांचे आत्मचरित्र ‘माती आणि मोती’ पुस्तक देऊन सत्कार केला.याप्रसंगी न्यू हायस्कूल यशवंतनगरचे क्रीडाशिक्षक प्रकाश पाटील ,कुस्तीउकोच सुनिलआप्पा चंदनशिवे, कुस्तीकोच दिगंबर राजमाने आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.