प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेत समूह राष्ट्रगीताचे गायन : महापौर आयुक्त आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी गायले राष्ट्रगीत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत सकाळी 11 वाजता समूव्ह राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
या राष्ट्रगीत गायनामध्ये महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपाआयुक्त सुनील पवार , अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे , उपायुक्त राहुल रोकडे , शहर अभियंता संजय देसाई, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, विजय घाडगे, समाजकल्याण सभापती सुबराव मद्रासी, मनपाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या समूव्ह राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला . मनपाचे ब्रँड अंबेसिडर आणि गायक दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत सादर केले आणि उपस्थित सर्वांनीच एकत्रितपणे राष्ट्रगीताचे गायन केले. प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , गिरीश पाठक आदीसह अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.