प्रतिष्ठा न्यूज

तासगाव प्रभाग दोन मधील मळे भागात जाणाऱ्या रस्त्याचे अरुण साळुंखे यांच्याकडून मुरुमीकरण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये बऱ्यापैकी मळेभाग, झोपडपट्टी भाग येतो.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मळे भागाकडे जाणारे सर्वच रस्ते हे खराब होऊन रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती.त्यामुळे तेथील नागरिकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागत होती.त्यामुळे नागरिकांनी हि बाब भाजपचे युवानेते अरुण साळुंखे यांच्या निदर्शनास आणून दिली.अरुण साळुंखे यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून काशीपुरा गल्ली येथून मळेभाग झोपडपट्टी कडे जाणाऱ्या रस्त्याचे तात्काळ मुरमीकरण करून घेतले.यावेळी अरुण साळुंखे,जयवंत दरेकर,पोपटराव देशमुख,राहुल हत्तीकर,गणेश दरेकर,प्रकाश दरेकर, वसंत मानकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.