प्रतिष्ठा न्यूज

मांजर्डेत आबांच्या जयंती निमित्त विधवा महिलांना साडी वाटप.. जिजामाता उद्योग समूह आणि मोहन नानांच्या मार्गदर्शनाने स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या जयंती निमित्त मांजर्डे येथील जिजामाता उद्योग समूह आणि राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत मांजर्डे मा.मोहन नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी महिला युवती अध्यक्ष संध्याराणी मंडले यांच्या संकल्पनेतून आज विधवा महिलांसाठी साडी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते ग्रा पं सदस्य सुरेश दादा खराडे,सर्व महिला ग्रा पं‌ सदस्या यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी 110 साड्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.