प्रतिष्ठा न्यूज

गणेश नगर येथे भव्य आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
कवठेमहंकाळ प्रतिनिधी दि. 10 : आज समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहचविण्याची आवश्यकता आहे.युवकांकडे कौशल्य आणि नवनिर्मितीची ऊर्जा आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात.त्यासाठी युवकांनी आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना जोपासली पाहिजे.वैयक्तिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी याची सांगड घालून कार्यरत असलेला युवकच समाजाचा विकास साधू शकतो.हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन वर्चस्व युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यात सक्रिय आहे. या फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर,स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड असे उपक्रम राबविले गेले आहेत.
कवठे महांकाळ मधील गणेश नगर येथे दिनांक 10 मार्च रोजी वर्चस्व युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व जगन्नाथशेठ शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराअंतर्गत सर्व प्रकारच्या मुतखड्यावरील शस्त्रक्रिया,किडनी,कॅन्सरवरील उपचार,पोटाच्या विकारावरील शस्त्रक्रिया,आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा शिबिर,नेत्र तपासणी,मधुमेह तसेच हृदयविकार,मेंदू विकार या सर्व विकार आणि आजारावरील उपचार करण्यात आले तसेच वर्चस्व युवा फाउंडेशन व जगन्नाथ शेठ शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या विकारावरील शस्त्रक्रिया मोफत करण्यास मदत केली जाणार आहे.
या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सिंधुताई गावडे,महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका शुभांगी शिंदे, शालन साळुंखे, वसुधा आंबे,रुपाली पाटील,अंगणवाडी सेविका प्रमिला निकम यांच्या हस्ते करून तसेच नगरसेवक रणजित घाडगे, ईश्वर वनखेडे, राहुल जगताप, अजित माने,युवानेते राहुल गावडे,सुरेश सूर्यवंशी,पिंटू पाटील,चंद्रकांत काशीद,बाळासाहेब पवार,शंकर काशीद,प्रकाश सूर्यवंशी,विसापूर सर्कलचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन पाटील,रामभाऊ साळुंखे,आप्पासाहेब पवार,दीपक पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
या भव्य आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वर्चस्व युवा फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन राजमाने, कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष सुशांत निकम,शहर प्रमुख अक्षय सूर्यवंशी,अजित पवार तसेच फाउंडेशनचे सांगली जिल्ह्यातील इतर पदाधिकारी यांनी तसेच जगन्नाथशेठ शिंदे युवा मंचचे सर्वेसर्वा जगन्नाथ शेठ शिंदे तसेच मंचचे इतर बाळासाहेब यादव,आदर्श साळुंखे,निलेश साळुंखे,गणेश पवार,प्रथमेश सूर्यवंशी,महेश पवार,इंद्रजित निकम,प्रशांत शिंदे यांनी केले होते.सेवासदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मुत्थुट फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.