प्रतिष्ठा न्यूज

प्रतापगडाच्या पायथ्याचा अफजलखानाचा बेकायदेशीर दर्गा शिवभक्तांच्या एकजुटीमुळेच जमीनदोस्त: माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सातारा प्रतिनिधी : सातारा शहरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना तसेच शिवभक्तांच्या वतीने गजानन मंगल कार्यालयामध्ये श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाचा 21 वर्षाचा लढा यशस्वी केल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांचा भगवी शाल व सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारचे उपनगराध्यक्ष बाल विकास गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अजित गुजर हे होते. या कार्यक्रमाचे संयोजन सागर पावशे मित्र समूहाचे अध्यक्ष नगरसेवक सागर पावशे यांनी केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य विश्रांत कदम यांनी केले.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान भक्तांनी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्यावर केलेले उदात्तीकरण व बेकायदेशीर बांधकाम शिवभक्तांच्या एकजुटीमुळेच जमीनदोस्त झाले. श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाने सलग 21 वर्षे या उदातीकरणाच्या विरोधात लढा दिला. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडे श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाने मागणी केल्यानंतर बुलडोझर लावून हे अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. 30 नोव्हेंबर शिवप्रताप दिनी शिंदे-फडणवीस सरकारचा हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल सत्कार करण्याचा निर्णय आपण घेतलेला असून सातारा जिल्ह्यातील हजारो शिवभक्तांनी या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रताप दिनास प्रतापगडावर उपस्थित राहावे असे आवाहनही नितीन शिंदे यांनी केले.
या आंदोलनातील आंदोलनकर्ते भाजपा माजी सांगली शहर जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याजवळ वनखात्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश देणारे राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. या शिवप्रताप दिनी प्रतापगडावर श्री शिव प्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या 21 वर्षाच्या यशस्वी लढ्याचे फोटो प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेंडे व संदीप पवार यांनी केले.
यावेळी नगरसेवक श्री कल्याण राक्षे, शिवप्रतिष्ठान साताराध्यक्ष सतीश उर्फ बापू ओतारी, काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी किशोर तापसे, नंदकुमार शिंदे, अरबाज शेख आदींसह सातारा शहरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.