प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये महिला दिनानिमित्त कार्यशाळा

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये १० मार्च २०२३ रोजी आदर्श पुर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक आणि पुर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अनिल जोशी, राहुल राजवर्धन, प्रा. राजश्री घंटी, प्रा. आदिती देशमुख, प्रा. अंजली पिसे आदींच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा व महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. अनिल ज्योशी आदींनी मनोगत व्यक्त करून महिलादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेत प्रा. संदीप लिंगे, प्रा. मनोज कोळी, प्रा. श्रीपाद घोंगडे, अमोल नवले यांनी काॅम्प्युटर मधील टेक्निकल विभागाची सविस्तर माहिती स्क्रीनद्वारे दिली.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, प्रा. धनश्री भोसले, माधुरी यादव, कविता आदलिंगे, स्मिता पिसे, रूपाली खंडागळे, अशिष येडगे, संतोष भुजबळ, बापु माने, गणेश वसेकर, दादासो बनसोडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन कुमारी श्रद्धा कुलकर्णी, साक्षी जवंजाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अंजली पिसे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.