प्रतिष्ठा न्यूज

विजय पारधी यांना आदर्श पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. 2 : तहसील कार्यालय गगनबावडा यांचे वतीने दरवर्षी एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त अधिकारी / कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येते.
यावर्षी पाच अधिकारी व चार कर्मचारी यांना गौरवण्यात आले. यामध्ये विजय उर्फ राजू पारधी, महसूल सहाय्यक यांना ज़िल्हास्तरावरून आदर्श कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्व आहे कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, महसूल वसुली, निवडणूक यामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.