प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडचे विनोद आसबे यांची दोन कंपनीत निवड; वार्षिक ६ लाख पॅकेजची नोकरी: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अशा विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होत असते. चालू शैक्षणिक वर्षांतील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विनोद शिवाजी आसबे यांची कॅम्पस मुलाखतीतून दोन कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शेळवे (ता.पंढरपूर) येथील कुमार विनोद शिवाजी आसबे यांनी काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असताना वर्ल्डलाईन ग्लोबल सर्विसेस प्रा. लिमिटेड आणि देवॲगल्स प्रा. लिमिटेड या दोन कंपनीत कॅम्पस मध्ये मुलाखती दिल्या होत्या. वर्ल्डलाईन ग्लोबल सर्विसेस प्रा. लिमिटेड कंपनीत (वार्षिक पॅकेज ६ लाख) आणि देवॲगल्स प्रा. लिमिटेड कंपनीत (वार्षिक पॅकेज ३ लाख) पगार असुन विनोद आसबे हे वर्ल्डलाईन ग्लोबल सर्विसेस कंपनीत १ जून २०२४ रोजी रूजू झाले आहेत. वर्ल्डलाईन ग्लोबल सर्विसेस ही फ्रेंच बहुराष्ट्रीय पेमेंट आणि व्यवहार सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९४७ मध्ये करण्यात आली होती. या कंपनीचा उद्देश अग्रगण्य डिजिटल पेमेंट, व्यवहार उपाय डिझाईन करणे आणि ऑपरेट करणे हा आहे.
अशा या कंपनीत विनोद आसबे यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.