प्रतिष्ठा न्यूज

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत गत सव्वा वर्षात व्यावसायिकांना 226 प्रकरणात 34 लाखाहून अधिक दंड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 4, (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत एकूण 670 विविध अन्न पदार्थांचे अन्न नमुने तपाणीसाठी घेतले. त्यापैकी 87 नमुने कमी दर्जा, लेबलदोष व असुरक्षित दर्जाचे आढळून आले. उर्वरित नमुने हे कायद्यातील मानदाप्रमाणे प्रमाणित दर्जाचे असल्याचे घोषित झाले आहेत. कमी दर्जा व लेबलदोष आढळून आलेल्या 48 प्रकरणी न्यायनिर्णय दंड 12 लाख 39 हजार रूपये ठोठावला आहे. तसेच छोट्या व्यावसायिकांच्या तपासणी व नमुने घेवून आढळून आलेल्या दोषाच्या अनुषंगे 278 प्रकरणी 22 लाख 22 हजार 500 रूपये इतका तडजोड दंड आकारण्यात आला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
या कालावधीत विविध अन्न आस्थापनांच्या 1 हजार 300 तपासण्या करण्यात आल्या असून दोष आढळून आलेल्या 193 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठविण्यात जाली आहे. दोषांची पूर्तता न करणाऱ्या 31 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. संशय असलेल्या अन्न पदार्थांबाबतच्या एकुण 36 प्रकरणी धाडी जाती केली असून 1 लाख 89 हजार 173 कि.ग्रॅ. इतका साठा जप्त करण्यात आला. याची किंमत 1 कोटी 47 लाख 32 हजार 935 रूपये इतकी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या प्रतिबंधित पदार्थांच्या 14 प्रकरणी धाडी टाकून 3468.574 कि.ग्रॅ. साठा जात करण्यात आला असून त्याची किंमत 54 लाख 76 हजार 323 रूपये इतकी आहे. धाडी जप्ती मध्ये ग्राहकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक अन्न पदार्थ जसे खाद्यतेल व दुध याबाबतही धाडी जप्ती टाकण्यात आलेल्या आहेत. स्वाद्यतेलाचा 99 लाख 90 हजार 570 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचा 21 लाख 38 हजार 473 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेलाचे 144 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून पैकी 14 नमुने कमी दर्जाचे आढळून आले आहेत. दुधाचे 126 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असुन पैकी 11 नमुने कर्मी दर्जाचे आढळून आले आहेत. तसेच मसाल्याचे 29 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असुन पैकी 3 नमुने कमी दर्जा व लेबलदोष आढळून आले आहेत. मिठाई, फरसाण जिलेबी इत्यादीचे 48 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असुन त्यातील काही नमुने कमी दर्जा व असुरक्षित आढळून आले आहेत.
तसेच 64 प्रकरणी मे. न्यायालयात फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा असूनही भक्कम काम केल्याचे वरील सांख्यिकी माहितीवरुन दिसुन येते. या कालावधीत इट राईट कॅम्पस अंतर्गत 6 संस्थांना केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जत येथिल धानम्मा देवस्थानास भोग चा दर्जा प्राप्त करून दिला व 775 अन्न व्यवसायिकांना अन्न पदार्थ हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना 5 स्टार हायजिन रेटिंगचा दर्जा प्राप्त करुन दिला. अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कोळी, श्री. महाजन, श्रीमती फावडे, श्रीमती पवार, श्रीमती हिरेमठ, श्री. केदार व श्री. स्वामी यांनी सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजात सक्रीय सहभाग घेवून जनतेस निर्भेळ अन्नः मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.