प्रतिष्ठा न्यूज

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा ! – हिंदु जनजागृती समितीचे हिंदूंना आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदु जनजागृती समितीच्या 20 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने 3 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घरांवर तिरंगा फडकवून देशप्रेम व्यक्त केले. याचप्रकारे आता ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभागी होऊन हिंदु राष्ट्र प्रेम व्यक्त करावे आणि हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

*‘हर घर भगवा’ मोहिमेत कसे सहभागी व्हाल ?*

‘हर घर भगवा’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भगव्या ध्वज आपल्या घरावर लावून त्यासोबत ‘सेल्फी’ काढावा आणि तो ‘फेसबूक’, ‘ट्वीटर’, ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करावा. फोटो पोस्ट करतांना #HarGharBhagwa हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. या अभियानासाठी समितीने HinduRashtra.HinduJagruti.org  हे स्वतंत्र ‘पेज’ चालू केले असून या पेजवर हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होण्याविषयी प्रतिज्ञा देण्यात आली आहे. आतापर्यंत  ही प्रतिज्ञा घेणार्यांना, तसेच ‘हर घर भगवा’ या अभियानात सहभागी होणार्यांना समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र वीर’ प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरील ‘पेज’वर जाऊन ‘फॉर्म’ भरावा, असे समितीने म्हटले आहे.

या अभियानाविषयी अधिक माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई म्हणाले ‘‘सांगली जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला आहे.अनेक सामान्य हिंदूंनी या अभियानात सहभागी होत त्यांच्या घरांवर अभिमानाने भगवा ध्वज फडकवला आहे. ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’अंतर्गत आतापर्यंत 33,600 जणांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली आहे. या अभियानात हिंदु राष्ट्रावर आधारित 3000 व्याख्याने, 2000 फलकप्रसिद्धी, 1000 मंदिरांची आणि 250 ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, 350 महिला संघटन उपक्रम राबवण्यात आले आहेत.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.