प्रतिष्ठा न्यूज

विजयादशमीच्या स्वागताला कवठेएकंद सज्ज : स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव, काय डोंगर काय झाडी, लक्षवेधी आतषबाजी

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : कवठे एकंद ता.तासगांव येथिल ग्रामदैवत श्री सिद्धराजाचा विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा बुधवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी रात्री आसमंत उजळून टाकणारी नयनरम्य आतषबाजी होणार आहे.
या सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून कवठे एकंदनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

श्रींच्या पालखी सोहळ्यास रात्री ८वा.पासून प्रारंभ होणार असून मानकरी चव्हाण -पाटील , सेवेकरी, गुरव -पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत शिलंगण चौक येथे दसऱ्याच सोनं ”आपटा” पूजन होवून शिलंघन्नास प्रारंभ होतो. हजारो भाविकांच्या हर हर च्या जयघोषात, रस्त्यावर दुतर्फा शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण होते. आतषबाजीच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यामुळे ”महाराष्ट्राची शिवकाशी ”म्हणून कवठे एकंद ची ओळख बनली आहे. आतषबाजीचा उत्सव अधिक सुखकर करण्यासाठी भाविक ग्रामस्थ,समन्वय यात्रा कमिटी, प्रशासन,पोलीस विभाग आदी कडून प्रबोधन केले आहे.

✳यावर्षी सोहळ्यासाठी खास आकर्षण म्हणून ए वन युवा मंच, व ईगल फायर वर्क्स कडून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फायटर विमानाने अवकाशात तिरंगा, शहीद जवान स्मृतिस्थळावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी, एअर फोर्स अर्मी च्या हेलिकॉप्टरची प्रतिकृती साकारली आहे.

श्री राम फायर वर्क्स चे .”झुंबर औटांचा शो, धबधब्यातून गुहाटीतील काय डोगर, काय झाडी ची पोस्टबाजी,घागर डिजिटल औंटांची आतषबाजी ”शहीद भगतसिंग मंडळा कडून स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतचा नकाशा ची प्रतिकृती,सिध्दीविनायक मंडळाकडून ”उगवता सुर्य, व नयनरम्य औंटांची आतषबाजी तर जमादार दारू शोभा मंडळाकडून ” चांदणी चौक ब्रिज , सांगलीचा राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिपटींग रोप्यपदक विजेता सकेंत महादेव सरगर यांचे आतषबाजीतून हार्दिक अभिनंदन केले जाणार आहे. तोडकर बंधू च्या नयनदीप दारू शोभा मंडळाकडून नोएडा येथील 32 मजली इमारत जमीनदोस्त हा प्रयोग आतषबाजीतून साकारण्यात येणार, तर फिरत्या हत्तीच्या सोंडेतून आतषबाजी तर कोरे आड्ड्याच्या सत्वशील मंडळाची फेमस लाकडी शिगटे तर
”सिध्दराज फायर वर्क्स कडून रंगीत झाडकाम, क्रॅकर चक्र तसेच आकाशतारा मंडळाकडून अवकाश व्यापणारी चक्राची कमान, गोकाक धबधबा, अजिंक्यतारा मंडळाचे. .”कागदी शिंगटांची फायर शो” असे नाविन्यपूर्ण प्रकार आतषबाजीतून हाताळले जाणार आहेत . याबरोबरच महावीर दारू शोभा मंडळ, सप्तरंग, हरहर, आकाशदीप, जय हनुमान, अंबिका, गोल्डन, हिंदू-मुस्लीम, आझाद, नेत्रदीप,जय जवान, नवतरुण, शिवशक्ती, अहिंसा, त्रिमूर्ती, सिद्धराज, नवदीप, नयनदीप, अजिंक्यतारा, जय जवान, चर्मकार, शिवतेज, पार्श्वनाथ, बसवेश्वर, तिरंगा, फॅन्सी, ईगल, लव अंकुश, शिवछत्रपती, स्वराज्य, नरवीर उमाजी नाईक दारु शोभा मंडळाकडून पारपारिक रंगीत चक्रे, पंचमुखी, सुर्यपान, नयनरम्य ठिणग्यांचा वर्षाव करणारी झाडे, बुरूज, दांडपट्टा, कागदी शिंगटे अशा पारंपारिक दारूकामाला अधिक पसंती दिली आहे.
नागाव कवठे येथेही तिरंगा मित्र मंडळ, धूम धडाका, नागनाथ, नवतरुण, ढोबळे बंधू, नाईक बंधू, शिवशक्ती,नागराज, गजराज, समाधान, जनसेवा, बाळूमामा, दि ग्रेट मराठा, मंगलमूर्ती अशा विविध ठिकाणच्या शेकडो मंडळाकडून दारूकाम अधिक सुखकर व खात्रीशीर बनवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते,भाविक झटत आहेत.
✳आतषबाजीचा इतिहास पाहीला असता पूर्वी मंदिराभोवती जंगल होते. दशमी च्या पालखी सोहळ्याप्रसंगी जंगलातील प्राण्यांना पळवून लावण्यासाठी आरत्या, दिवट्या सह प्रखर प्रकाश व आवाजाच्या फटाके बनवण्याची प्रारंभ गरजेतून झाला. आज परंपरागत दारूकामाला आधुनिक कलाप्रकाराची झालर चढवली आहे. परंपरा ,भक्ती, आणि कलेचा सुरेख नजराणा शोभेच्या दारूकामाचे वैशिष्ट्य बनला आहे.
म्हैसूर पाठोपाठ कवठेएकंद व नागांव कवठे येथे विजया दशमी दिवशी आतषबाजी केली जाते.डोळ्यांचे पारणे फेडणार्या या सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थिती लावतात. देशभरातील कानाकोपऱ्यातील भाविकांचे आराध्य दैवत, कुलदैवत असणाऱ्या श्री सिद्धराज महाराजांच्या विजयादशमीचा सोहळा जणू ”भक्ती आणि कलेचा ”अनोखा संगमच ठरतो.

✳प्रशासकीय यंत्रणा सज्ज…
श्रींचा पालखी सोहळा व आतषबाजी कार्यक्रम निर्धारित वेळेत शांततेत व सुरक्षित रित्या संपन्न व्हावा. यासाठी तासगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, तहसीलदार रवींद्र रांजणे,यात्रा कमिटी अध्यक्ष कुलदीप शिरतोडे, सरपंच राजेंद्र शिरोटे, बिराडसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींनी पुढाकार घेतला आहे.

(नागाव कवठे येथे नागनाथा चा पालखी सोहळा )
नागाव कवठे येथेही मानकरी असणाऱ्या श्री नागनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. श्री नागनाथ मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई ने सजावट करण्यात आली आहे. दारू शोभा मंडळे भाविक यात्रा कमिटी नागावकर ग्रामस्थांकडून आतषबाजी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.