प्रतिष्ठा न्यूज

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित दक्षिण दिग्विजय मोहिम भाग्यलक्ष्मी माता मंदिर ते किल्ले गोवळकोंडा हजारोंच्या सहभागिने उत्साहात पार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित दक्षिण दिग्विजय मोहिम भाग्यलक्ष्मी माता मंदिर ते किल्ले गोवळकोंडा उत्साहाने पार पडली* ,या मोहिमेसाठी *विशेष अतिथी म्हणून सरनोबत, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज श्री सिद्धार्थदादा कंक व कंक परिवार , श्री व सौ प्रदीप जी पाटील (अध्यक्ष- पानिपत शौर्य समिती पानिपत), भाग्यनगर गणेश उत्सव समिती चे जनरल सेक्रेटरी डॉ भगवंत राव,व ज्या तलवारी ने येसाजी कंक यांनी ३५० वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथे हत्ती मारून इतिहास घडवला  तीच तलवार  आज परत याच ठिकाणी कंक परिवारासोबत होती, त्याचबरोबर सतीश जी अग्रवाल वरिष्ठ नेते भाजपा हजर होते*.

    *इमलीबन पार्क येथील शिवतीर्थावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना प्रमुख अतिथी हस्ते पुष्पहार अर्पण करून तद्नंतर भाग्यलक्ष्मी माता मंदिर चारमिनार येथे देवीचे दर्शन व आरती करुन मोहिमेला सुरुवात करण्यात आली ,सदर मोहिम ही भुदेवी माता मंदिर,बेगम बाजार छत्री,चुडी बाजार,जुम्मेरात बाजार,पुराना पुल , जियागुडा,रंगनाथ स्वामी मंदिर,कमेला , केसरीया हनुमान मंदिर, जैन मंदिर, दरबार मैसमा मंदिर, रामसिंगपुरा, लंगर हाऊस, छोटा बाजार मार्गे  किल्ले गोवळकोंडा येथील येलमा देवी चे दर्शन घेऊन , छत्रपती श्री शिवाजी महाराज व सरनौबत सरसेनापती येसाजी कंक यांना अभिवादन करून मोहिमेची सांगता करण्यात आली*

दक्षिण दिग्विजय मोहिम समारोप प्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरूपात श्री नितीन दादा चौगुले संस्थापक अध्यक्ष *श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनी  ‘ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली हिंदवी स्वराज्याची घोडदौड ही केवळ महाराष्ट्रापुरती चे मर्यादित नसुन अखंड हिंदुस्थानभर झालेली होती, महाराजा नंतर या हिंदवी स्वराज्याचे विस्तार अटक ते कटक,पेशावर ते तंजावर पर्यंत पसरला होता.म्हणुन दरवर्षी हा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरती न ठेवता देशभर झालेली ही घोडदौड संपूर्ण विश्वाला सांगण्यासाठी आपण ह्या मोहिमेचे आयोजन करतो.या वर्षी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षाचे औचित्य साधून आपण हि दक्षिण दिग्विजय मोहिम आयोजित केली आहे तसेच याच गोवळकोंडा मध्ये हत्ती शी युद्ध करून त्यास नामोहरम करणार्या सरनौबत येसाजी कंक यांना यंदाची मोहीम समर्पित करीत आहोत असे म्हणाले*’.

श्री सिद्धार्थदादा कंक आपल्या भाषणात म्हणाले,”४ फेब्रुवारी १६७७ नंतर म्हणजे तब्बल ३४७ वर्षांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार सरसेनापती येसाजी कंक यांच्या पराक्रमाच्या स्थळी भेट देण्याचे भाग्य श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या मोहिमेमुळे पुन्हा मिळाले. सरसेनापती येसाजी कंक यांच्या पराक्रमाचा वारसा आमच्या पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवला आहे.”

डॉ भगवंत राव यांनी या दक्षिण दिग्विजय मोहिमने  शिवकालीन तो पावन प्रसंगाची आठवण करून दिली व संपूर्ण तेलंगणा ला ह्या गौरवशाली घटनेचे साक्षीदार होता आले त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे आभार मानून भविष्यात देखील अशा मोहिमेत सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले.
सतिश जी अग्रवाल यांनी
*श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या मोहिमेमुळे तेलंगणा प्रांतात एक भगवे वादळ निर्माण झाले व ती येणाऱ्या हिंदुराष्ट्र निर्माण ची नांदी असेल असे गौरवोद्गार काढले,तर प्रदीप पाटील यांनी मागच्या वर्षी चे पानिपत येथील अनुभव सांगत आज तेलंगणा मध्ये देखील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या मोहिमेमुळे एक नवशिवचैतन्य निर्माण झाले जसे छत्रपती एक एक मोहीम करुन स्वराज्य विस्तार केले त्याच पद्धतीने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान देखील आपले शिवशंभू कार्य प्रत्येक राज्यात वाढवून  पुन्हा इतिहास घडवत आहे असे कौतुक केले*.

*तेलंगणा येथील  भाग्यलक्ष्मी माता मंदिर चे शशिकला दीदी यांनी देखील या मोहिमेत आपले अमुल्य योगदान दिले*
तसेच मराठा मंडळ चे मदन भाऊ जाधव,दिलिप जगताप,जियागुडा चे नगरसेवक श्री दर्शन बोहानी, गोवळकोंडा चे बाला प्रसाद तिवारी, विनोद दादा पवार,अक्षय अर्जुन, श्री चेरूकुला उदय कुमार,श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान  भाग्यनगर चे प्रमुख श्री महेश शर्मा , श्री अलवार इंद्रसेन रेड्डी, श्री निवासजी देवरा, श्री राजेन्द्र दिगान,, दिनेश जगताप सह शांतकुमार जी ,क्षत्रिय युवा,मराठा युवा मंच , अग्रवाल युवा मंच सह अनेक शिवप्रेमी व शिवभक्त स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते मोहीम साठी स्वयंसेवक असणाऱ्या सर्व बाइकर्स चे देखील नियोजन साठी श्री नितीन दादा चौगुले यांनी कौतुक केले. *या मोहिमेत महाराष्ट्र राज्य मधुन मराठवाडा, विदर्भ,कोकण, कान्हा देश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, खानदेश सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व युवा सहकार्यानी तेलंगणा येथील वातावरण भगवेमय करून एक नव इतिहास घडवला*
*दक्षिण दिग्विजय मोहिमेचे पदयात्रा दरम्यान अनेक ठिकाणी स्थानिक शिवभक्तांकडुन पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले तसेच स्थानिक शिवभक्तांकडुन मोहिमेतील सहभागी शिवभक्तांसाठी अल्पोपहार,पाणी ,गुलकोज,शरबत इत्यादी चे व्यवस्था करण्यात आली होती प्रथमच तेलंगणा प्रांतात अश्या प्रकारे मोहीम निघाल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक तेलंगणा मधील शिवभक्तांनी मोहिमेचे तर जंगी स्वागत केले परंतु शिवशंभू च्या भगव्या वादळाने भारावून त्यांनी शिवाजी महाराज की जय ,वंदे मातरम्,जय श्री राम च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला*.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.