प्रतिष्ठा न्यूज

पर्यटकांचे आकर्षण असलेला सांगशीतील पाचव्या शतकातील अतिप्राचीन शिलालेख दुर्लक्षित

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आपण भारतीय आपल्या देशातील प्राचीन शिल्प कलेकडे कसे दुर्लक्ष करतो याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटरवर कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर सांगशी, तालुका गगनबावडा येथील ग्रामदैवत सांगसाई मंदिरातील शिलालेख. हा शिलालेख ग्रॅनाईट दगडावर ब्राम्ही लिपी मध्ये कोरलेला आहे.
पाचव्या शतकांतील चालुक्य राजा मंगलेश याने आपली पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला हा शिलालेख म्हणजे आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ केलेले जगातील पहिले स्मारक आहे. एक प्रेम कहाणी आहे. शाहजहानाने आपली राणी मुमताजच्या समरणार्थ बांधलेला ताजमहाल चारशे वर्षांपूर्वीचा आहे, तर राजा मंगलेशने हे बांधलेले स्मारक पंधराशे वर्षांपूर्वीचे प्राचीन आहे.
या प्राचीन शिलालेखाचे संशोधन प्रथम १९८३ मध्ये डॉ.जे. एफ. फ्लिट यांनी केले. त्यानंतर पी.बी. देसाई, रा. प पंडित यांनी संशोधन करून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेल्या आहे. हा प्राचीन असलेचा Insscription from Kolhapur District –Edits by Dr. S.H.Ritti &Shri A.B.Karvirkar यांनी कन्नड विद्यापीठ हम्पीने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात मान्य केलेले आहे.
हा दुर्मिळ, व अतिप्राचीन असलेला शिलालेख सध्या दुर्लक्षित आहे. याबाबत पुरातत्व विभागाकडे ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित व्हावे, अमूल्य ठेवा जतन व्हावा. आजूबाजूला सुशोभीकरण व्हावे म्हणून ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर फेब्रुवारी २०१३ मध्ये पाहणी झाली,पण पुन्हा शासनास विसर पडलेला आहे.
शासनाने त्वरित लक्ष घालून, या दुर्लक्षित अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी सोई, सुशोभीकरण करावे, त्यामुळे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील. व त्यामुळे रोजगारही उपलब्ध होईल. अशी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे.

“आमच्या घराण्याकडे परंपरेने पूजेचा मान आहे. हा शिलालेख चित्रमय असून पर्यटक येत असतात. पण अद्यापही सोयी व सुशभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने इतिहास प्रेमींचा हवा तसा प्रतिसाद नाही. शासनाने व पर्यटन केंद्राने प्रामुख्याने लक्ष देणे जरुरीचे आहे”
-राजेश पाटील, माजी उपसरपंच

 

“इतिहास संशोधक कै. रा. प. पंडित ( वंशज, गगनबावडा जहागिरी ) यांनी आपल्या पुस्तकातून या शिलालेखासंबंधी प्रकाश ज्योत टाकण्याचा प्रयत्न केला होता. शिलालेखाच्या आजूबाजूच्या माळरानावर युद्धभूमी होती. त्याचे उत्खनन व संशोधन होणे गरजेचे आहे. ”
– बंडू आप्पा पडवळ
संचालक, डी वाय पाटील साखर कारखाना.

 

“ग्रामपंचायत च्या वतीने आम्ही ठराव करून शासनाकडे पाठवले आहेत तथापि अद्यापही शासनाने दुर्लक्ष केलेले आहे.”
– भास्कर माने,
सांगशी- सैतवडे ग्रामपंचायत

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.