प्रतिष्ठा न्यूज

चंपाबेन बालचंद शाह कॉलेज मध्ये रंगला हादगा गरबा

प्रतिष्ठा न्यूज / दिपक दुधगावकर
सांगली : श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालया मध्ये सांस्कृतिक विभागा मार्फत हादगा आणी रास दांडीया गरबा कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.भारतीय संस्कृती मध्ये पारंपारिक खेळांना खूप महत्व आहे.या खेळांची जपवणूक व वृद्धी व्हावी या उद्देशाने स.९वा.हादगा या खेळाचे आयाेजन केले फेर धरुन गाणी झाल्यावर खिरापतीचे वाटप झाले.व त्यानंतर गरबा या सामुहीक लाेकनृत्याला सुरुवात झाली.विविध केशभूषा वेशभूषे मध्ये असलेल्या विद्यार्थिनी गाण्याच्या तालावर गरब्याचा ठेका धरुन तुफान गिरक्या घेत हाेत्या.त्यांच्या सुपर एनर्जीने कार्यक्रमाची रंगत वाढली.
या कार्यक्रमा साठी श्री गुजराती सेवा समाज सांगली चे अध्यक्ष मा.कांतीभाई वामजा,सेक्रेटरी मा.दिपकभाई शाह, मा.अरुणभाई शेठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.खिलारे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे आयाेजन सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनिता बाेर्डे, स्नेहसंमेलन विभाग प्रमुख प्रा संध्या खिलारे , प्रा.सुवर्णा जाेशी, प्रा.डॉ.सुश्मिता दुर्गुळे, प्रा.डॉ एस.एन.गायकवाड, प्रा.संजय ओतारी, प्रा.अंजना मगदूम,प्रा प्रमिला तावडे यांच्या अथक परीश्रमातुन झाले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थीनी माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.