प्रतिष्ठा न्यूज

मोदींचा हा करिश्मा आगामी सर्वच निवडणुकांत दिसेल : आमदार सुधीरदादा गाडगीळ; तीन राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया; सांगलीत जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत भाजपच्या विजयानंतर सांगलीत कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष केला.

यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, तीन राज्यातील निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा निकाल म्हणजे भ्रष्ट्राचारमुक्त सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेला जनतेने समर्थन मिळाल्याचे द्योतक आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या महत्वाच्या राज्यातील निकालाने देशातील मतदारांचा कौल स्पष्ट झाला आहे. तेलंगणा मध्येही चांगल यश मिळालं आहे मला खात्री आहे की तेलंगणातही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष होईल. मी स्वतः मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ दक्षिण पश्चिम या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात प्रचारासाठी आठ दिवस तळ ठोकून होतो. कठीण वाटणाऱ्या या मतदारसंघात भाजपचे भगवानदास सबनानी यांनी कमळ फुलवले. संघटनेच्या विविध पदांवर दोन तपांहून अधिक काळ काम केलेल्या भगवानदास सबनानी यांच्या विजयासाठी हातभार लावू शकलो, याचे समाधान आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.