प्रतिष्ठा न्यूज

मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकामध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल खासदार संजयकाका पाटील यांनी केले अभिनंदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल तेथील जनतेचे ,या यशासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांचे लोकसभा मतदार संघाच्या वतीने खासदार संजयकाका पाटील यांनी अभिनंदन केले.

चारपैकी तीन राज्यामध्ये भाजपची सत्ता आली आहे ,या तीनपैकी दोन राज्यामध्ये पूर्वी काँग्रेस ची सत्ता होती ,त्या राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार केले आहे.या निकालातून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. तसेच नरेंद्र मोदी हेच देशाचे खंबीरपणे नेतृत्व करू शकतात यावर शिक्कामोर्तब झालं आहे.लोकसभा निवडणुकांच्या पर्श्वभूमीवर या निकलाना देशभरात महत्व प्राप्त झाले होते.देशातील जनतेचे या निकालाकडे लक्ष होते.आणि अपेक्षेप्रमाणे निकाल भाजपच्या बाजूने आले आहेत.देशभरात मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली कामे आणि भविष्यातील मोदिजीनी पाहिलेले प्रगत भारताचे स्वप्न यावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे.जगभरातील सर्व देशांशी असलेले मोदीजींचे संबंध आणि त्यामुळे आपल्या देशाची उंचावलेली प्रतिमा ..या सुद्धा लोकाना भावलेल्या आहेत.या सर्व बाबींमुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा येकदा लोकसभा जिंकून सत्तेत येईल यावर मतदारांनी दाखवलेला हा विश्वास आहे हे या निकालावरून दिसून येत आहे.या तिन्ही राज्यांतील विजयासाठी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी व तिन्ही राज्यातील प्रमुख नेते मंडळी यांचे सांगली लोकसभा मतदार संघाच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघ संघाचे खासदार श्री संजयकाका पाटील यांनी
खूप खूप अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.