प्रतिष्ठा न्यूज

राजमाता अहिल्याबाई महान योद्धा, कुशल प्रशासक होत्या -तुकारामबाबा महाराज; सोन्याळ येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी; तरुण मंडळाकडून महाप्रसादाचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सोन्याळ प्रतिनिधी : अतिशय दानशूर , कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीले आहे त्या लोक कल्याणकारी , प्रजाहित दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती सोन्याळ ता जत येथे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती आणि मानव मित्र संघटनेचे सर्व्हेसर्व्हा तुकारामबाबा महाराज यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी सरपंच पती जकान्ना निवर्गी, माजी उपसरपंच चिदानंद तेली, सिद्दू पुजारी, सांगू पुजारी, संजय तेली, शिवानंद माडग्याळ, चनप्पा नंदुर, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, लखन होनमोरे, विजय विठ्ठल देवस्थानाचे चेअरमन शिवानंद पुजारी, सोमनिंग बसवंत पुजारी, विक्रम पुजारी, मल्लिकार्जुन पांढरे, विठ्ठल हणमंत पुजारी, अवन्ना पुजारी, चंदू पुजारी, कलमेश पुजारी आणि सोन्याळ, लकडेवाडी, गारळेवाडी नं १ आणि २ येथील अहिल्यादेवी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तुकारामबाबा महाराज म्हणाले की, खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोक उपयुक्त कार्य केले. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले. स्वत:च्या संस्थाना बाहेरही त्यांनी लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळे, , विहिरी, तलाव, मुक्या प्राण्यांना पानवटे, नदीघाट, लोकहिताची अनेक कामे, जातीभेद, धर्मशाळेसारख्या असंख्य
सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत.
अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या सोयीसह देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना
रुजवण्याचे मोलाची कामे त्यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लढाऊ, महान
योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या.
महिलांच्या सक्षमीकरणाची कामे त्यांनी त्याकाळात केली. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण
अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिले. गुंडाचा बंदोबस्त केला. लोक कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारल्या. अहिल्याबाई होळकर
महान राज्यकर्त्या होत्या असे सांगून त्यांचे विचार आपण सर्वांनी डोळ्यांसमोर ठेऊन आचरण करणे खूप गरजेचे आहे असे आवाहन बाबांनी यावेळी केले. संध्याकाळी उशिरा गावातून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे आवाहन
सध्या जत तालुक्यात पाणीबाणी सुरु आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. तापमान वाढ हे मानवावर गंभीर संकट आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धानाची गरज आहे. जत तालुक्यात पडणाऱ्या सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या दुष्काळ, अतिवृष्टी, आदी पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास भविष्यात मानवी जीवन सुखकर आणि आनंदी राहील. जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याबरोबरच प्रत्येक तरुणांने वृक्ष लागवड चळवळीत सहभागी होऊन झाडे लावून ती जगवून आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होईल. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने येत्या पावसाळ्यात वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.