प्रतिष्ठा न्यूज

कासेगाव येथील खून आई- बहीणी वरून शिव्या दिल्याच्या रागातूनच झाल्याचे उघड; एकास अटक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कासेगाव येथील मज्जिद युसुफ आत्तार वय ६० रा, कासेगाव ता वाळवा जि सांगली
याच्या खुनाचा गुन्हा उघड झाला असून खून प्रकरणी संशयीत हणमंत राजाराम पाटील वय ४४ रा, शेणे ता. वाळवा जि, सांगली यास जेरबंद करण्यात आले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना तपासात यश आले आहे. आई बहीणी वरून शिव्या दिलेले सहन न झाल्या मुळे सदरची घटना घडली. अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुन्ह्याची हकीकत अशी
दिनांक २१.७.२०२२ रोजी रात्री १०.०० वा. पुर्वी यातील मयत नामे मज्जिद युसुफ आत्तार वय ६० रा, कासेगाव ता. वाळवा जि. सांगली याचा कासेगाव ते घाटेगाव जाणारे रोडचे उत्तरेस असले राजारामबापु साखर कारखाना गट ऑफीसचे गेट समोर सिमेंट क्रॉन्किटच्या दगडाने डोक्यात मारुन त्याचा खून करण्यात आला होता, याबाबत कासेगाव पोलीस ठाणे येथे बबलु मज्जिद आत्तार वय ३४ रा, कोल्हापुर करवीर शाहुपुरी, ९५७, ई वार्ड, ७ यी गल्ली ता, जि कोल्हापुर मुळ गाव कासेगाव आत्तारगल्ली ता वाळवा जि सांगली यांनी फिर्याद दिल्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.पोलीस अधिक्षक दिक्षीत गेंडाम, मा. अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले मॅडम यांनी कासेगाव पोलीस ठाणे कडील न उघडकीस आलेल्या खुनाच्या गुन्हयाबाबत आढाव बैठक घेऊन पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कासेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि अविनाश मते यांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ.शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, विशाल येळेकर व कासेगाय पोलीस ठाणे, यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वरील सर्व पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचा तपास चालु केला, त्यावेळी कासेगाव पोलीस ठाणे हद्दीत मध्ये गोपनीय बातमीदार तयार करुन माहिती घेतली असता वरील पथकास खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा हणमंत पाटील रा शेणे ता बाळवा यांनी काही एक न ऐकता दारुच्या नशेत तो आई बहिणी वरुन शिवीगाळ करुच लागला. त्याचा राग हणंमत पाटील यास सहन न झालेने रागाच्या भरात राजारामबापू साखर कारखाना गट ऑफीसचे गेट समोर मज्जिद आत्तार यास खाली पाडुन तेथे पडलेला सिमेंट क्रॉन्फिटचा दगड डोक्यात मारुन त्याचा खून केला असल्याचे कबुल केले आहे.

केला आहे. सदरचा संशयीत इसम हा कासेगाव मध्ये असल्याचे माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील पथकाने त्यास कासेगाव मथुन चौकशी कामी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाय विचारता त्याने आपले नावे हणमंत राजाराम पाटील वय ४४ रा, शेणे ता. वाळवा जि, सांगली असे सांगितले. त्याचेकडे कासेगाव पोलीस ठाणे कडील राजारामबापु साखर कारखाना गट ऑफीसच्या गेट समोर डोफीत सिमेंट क्रॉन्किटच्या दगडाने मारुन केले खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यावेळी त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, हणमंत पाटील याने सागितले की, तो य मयत नामे मज्जिद आत्तार हे दोघे शेणे मधील राहणारे असल्याने त्यांची ओळख होती. २१.७.२०२२ रोजी दुपारी मयत नामे मज्जिद आत्तार याने हणमंत पाटील यांस दारुच्या नशेत आई, बहिणी वरुन शिवीगाळ केली होती. त्यावेळी मज्जिद आत्तार हा दारु पिला आहे म्हणुन हणमंत पाटील याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री ०९.१५ या सुमारास मयत नामे मज्जिद आत्तार व हणमंत पाटील यांची भेट झाली. त्यावेळी हणमंत पाटील यांनी दुपारी मला का शिवीगाळ केली याचा जाब विचारला असता, मयत नामे मज्जिद आत्तार यांने पुन्हा हणमंत पाटील यास आई बहिणीवरुन शिव्या देऊ लागला. हणमंत पाटील याने त्यास समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो

आरोपी हणमंत पाटील यास पुढील तपास कामी कासेगाव पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास कासेगाव पोलीस ठाणे करीत आहे.

या तपासात सहभाग घेतलेले अधिकारी व कर्मचारी असे
पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शेंडगे तासगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली
१) पोनि सतिश शिंदे (स्था.गु.अ.शाखा) २) सपोनि अविनाश मते (कासेगाव) ३) सपोनि प्रशांत निशानदार ४) सपोनि शिंदे ५) पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर 1 सुनिल चौधरी, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, अनिल कोळेकर, चेतन महाजन सागर टिगरे, संदीप नलवडे, नागेश खरात, कुबेर खोत, रुषीकेश सदामते, संकेत कानडे, विनायक सुतार, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, (सायबर पोलीस ठाणे) कासेगाव पोलीस ठाणे, महेश गायकवाड, राहुल पाटील, दिपक घस्ते, अमित वंजारी

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.