प्रतिष्ठा न्यूज

पलूसकर शैक्षणिक संकुलात प्रभात फेरी व प्लास्टिक संकलन मोहीम : शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब यांचा प्लास्टिक संकलन मोहिमेमध्ये सहभाग

प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात प्लास्टिक संकलन मोहीम व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.. परिसर स्वच्छता अभियान व प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी माननीय मोहनराव गायकवाड साहेब, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा , संचालक सुनील रावळ , केंद्रप्रमुख राम चव्हाण मुख्याध्यापक तानाजी करांडे ,.मारुती शिरतोडे, बाळासाहेब खेडकर यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांनी शालेय पोषण आहार, हरित सेना,सांस्कृतिक विभाग,सर्व खात्यांचा आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी. चोपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली..

विद्यार्थ्यांनी घरोघरी तसेच दुकानांमध्ये जाऊन कचरा संकलन केले.सिंगल युज प्लॅस्टिकचे संकलन व वर्गीकरण केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे आदेशानुसार प्लास्टिक कचरा निर्मूलन दिन या निमित्ताने स्वछता उपक्रम राबविण्यात आला .
शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे व उपाध्यक्ष विश्वास रावळ, सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

गावातील सर्वांगीण स्वच्छता, प्लास्टिक कचरा संकलन व पुनर्वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता बाबत लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन प्लास्टिकबाबत जागृतीकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षक, विद्यार्थी सहभागातून राबविण्यात आला. पलूस स्टॅन्ड परिसर ,शिवदत्त कॉलनी, परांजपे कॉलनी, साई कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कौतुक केले.संकलित केलेल्या सर्व कचरा नगरपरिषदेच्या कचरा गाडीकडे दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.