प्रतिष्ठा न्यूज

दंत वैद्यकीय पदवी परीक्षेत डॉ.कु. पुजा शिंदे विशेष प्रविण्यासह घवघवीत यश- सर्वत्र अभिनंदन

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
नांदेड : तालुक्यातील धनेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक गणेशराव पाटील शिंदे यांची नात डॉ.कुं. पुजा मनोहर शिंदे हिने दंत वैद्यकीय क्षेत्राच्या अंतिम वर्षातील परीक्षेत विशेष प्राविण्य मध्ये गुण घेऊन उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केल्या बद्दल धनेगाव ग्रामस्थ व कुटूंबातील सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाजेगाव जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य मनोहर पाटील शिंदे यांची कन्या व ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव येथील ऊपसंरपच पद भूषवित असलेल्या  डॉ.कु.पुजा मनोहर शिंदे या श्री. गुरुदत प्रतिष्ठाण नांदेड संचलित नांदेड रूलर डेटंल महाविद्यालय व रिसर्च सेंटर नांदेड येथे दंत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेऊन तिन वर्षांचा दंत वैद्यकीय पदवी मध्ये चांगले गुण घेऊन विशेष प्राविण्यसह घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाली आहे.
तीने मिळविलेल्या या यशाबद्दल धनेगाव ग्रामपंचायतचे संरपच पिंटू पाटील शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य भुंजगराव भालके, यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक, तसेच कुटुंबातील सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाचे श्रेय डॉ. पुजा शिंदे हिने महाविद्यालयाचे प्राचार्य- प्राध्यापक व कुटुंबातील आजी, आजोबा, आई – वडील या सर्वांना दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.