प्रतिष्ठा न्यूज

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना, भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्ता रचना नायडू

विशेष संवाद : ‘जगभरात हिजाबला विरोध, तर भारतात हिजाबसाठी आंदोलन !’

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ? भारतातील घटना आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो. एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना, भारतातील हिजाबचे समर्थन करणारे आता कुठे आहेत, असा प्रश्न दुर्ग, छत्तीसगड येथील अधिवक्ता रचना नायडू यांनी उपस्थित केला. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘जगभरात हिजाबला विरोध तर भारतात हिजाबसाठी आंदोलन !’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात बोलत होत्या.
‘संगम टॉक्स्’च्या संपादिका तान्या म्हणाल्या की, हिजाबची सक्ती इस्लामिक देशांचा राजकीय कार्यक्रम आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या देशातील काही राज्यांतील शाळांमध्ये हिजाबला विरोध झाला, म्हणून मुसलमान मुलींनी आंदोलन केले. या घटनेचे व्हिडिओ नियोजितबद्ध पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्यात आले. शाळेमध्ये हिजाब घालूनच यावे, या मागणीसाठी या शाळेतील मुलींना वकीलही सहजपणे मिळाले आणि ते सर्वोच्च न्यायालयात पोचले. तसेच त्यांना मुसलमान संघटनांचे समर्थनही मिळाले. हिजाबचा विषय आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला गेला.

सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, ‘पारशी बांधवांचा पर्शिया देश इराण झाला. याच इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहे. काही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेत. नारीशक्ती एकत्रित आली, तर काय होऊ शकते, हे जगभरातून महिलांचा हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहे. इराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्यचार होत आहेत, ज्याला आता विरोध होत आहे. हिंदु धर्म महिलांना देवीसमान मानतो, या धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला अवश्य सुरक्षित राहतील.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.