प्रतिष्ठा न्यूज

पालकमंत्र्याच्या आवाहनाला तासगाव प्रशासनाकडून केराची टोपली… मनसेच्या निवेदना नंतरही मटका सुरूच…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सांगली जिल्ह्यातील वाढलेले गुन्हेगारीचें प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे शंभर टक्के बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा प्रशासनास केल्या होत्या.जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्यावर आता कोणाचाही मुलाहिजा न राखता कारवाई होणे आवश्यक असून शंभर टक्के अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पालक मंत्र्यांनी दिल्या होत्या.त्यानंतर जिल्ह्यात काही प्रमाणात अवैध धंद्याना आळा बसला होता,परंतु आता पुन्हा जैसे थे परस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
तासगाव तालुक्यातही काहीशी तशीच परस्थिती असल्याचे दिसत असल्याने दहा दिवसापूर्वी मनसेच्या महिला तालुका अध्यक्ष दीपाली पुंडेकर यांनी तासगांवसह तालुक्यात राजरोजपणे अनेक अवैध धंद्यांना ऊत आला असून लोकांची घरे उध्वस्त करणारा अवैध मटका पूर्ण पने बंद करा अन्यथा मनसे स्टाईलने आम्ही बंद करू असे निवेदन पोलीस प्रशासनास दिले होते.परंतु निवेदना नंतरही प्रशासनाने अजून कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नसून शहरात भर वस्तीत रहदारीचे ठिकाणी राजरोसपणे मटका सुरु असल्याचे दिसून येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.