प्रतिष्ठा न्यूज

पूरपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील जनतेने खबरदारी घ्यावी : निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन; २०० नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, धर्माबाद या ८ तालुक्यातील ३६ मंडळांमध्ये मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. यामध्ये बिलोली तालुक्यातील आदमपूर मंडळात सर्वाधिक २१३.७५ मिमी, देगलूर तालुक्यातील नरंगल (बु.) मंडळात २०१.७५ मिमी. पावसाची नोंद झालेली आहे.
१)२० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे ०५ बिहारी कामगार लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. उपविभागीय अधिकारी- सचिन गिरी यांनी स्थानिक स्थानिक लोक व शोध व बचाव पथक यांच्या मदतीने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
२) मुखेड तालुक्यात मौ. मोटरगा येथे ०३ लोक पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकून पडले होते. तहसिलदार- राजेश जाधव यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.
३) अचानक झालेल्या अतिपावसामुळे बिलोली येथील इंग्लिश लिटल ऑफ फ्लावर कॉन्व्हेंट स्कूल शाळेतील येथील पुलावरून पाणी जात असल्याने व पाण्याचा प्रवाह फार वाढल्याने तेथील मुलांना पालकांना व शिक्षक जेसीबीच्या मदतीने सुखरूपरित्या मार्ग काढून पाठवण्यात आले.
४) धर्माबाद तालुक्यातील बनाळी गावाजवळील नाल्याची पाणी पातळी वाढल्याने गावातील काही घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता होती. नायब तहसिलदार, तलाठी यांना सूचना मिळताच ते घटनास्थळी उपस्थित झाले त्यानंतर तहसिलदार आणि गट विकास अधिकारी जागेवर गेले व ज्यांचे घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. अशा जवळपास २०० नागरीकांचे मागील वर्षाप्रमाणे सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतर केले.
देगलूर तालुक्यातील लख्खा येथील गावात पाणी आल्याने तेथील ३० ते ३५ लोक गुरुद्वारा येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहेत. तसेच सुगाव येथील १५ ते २० लोक सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आले. वनाळी व सुन्दगी येथे काही घरांमध्ये पाणी शिरले आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
६) मा.जिल्हाधिकारी- अभिजित राऊत यांनी मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकरी, दुकानदार आणि नागरिक यांच्या भेटी घेतल्या.
दि.२१ जुलै २०२३ रोजी हवामान खात्याने येलो (Yellow) अलर्ट जरी केलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आन तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तरी या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा
आणि जनतेने खबरदारी घ्यावी. यासाठी सोबतची प्रेस नोट उद्याच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी. पूर परिस्थिती पूर उद्भवल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
१) पुराच्या पाण्यात शिरू नका.
२) सांडपाणी, मैलापाणी आदी वाहिन्यांपासून लांब राहा. ३) विजेचा धक्का बसणं टाळण्यासाठी विजेचे खांब, तुटून लोंबकाळणाऱ्या वीजतारा यांपासून लांब राहा. ४) खुलं असेल तर त्याच्या तोंडावर निर्देशक खूण म्हणजे लाल झेंडा किंवा अडथळा लावा,
५) पुराच्या पाण्यात चालू नका किंवा वाहन चालवू नका. दोन फुटांचं वाहत पाणी एखाद्या मोटारीला पटकन वाहून नेऊ शकत, हे लक्षात ठेवा.
६) ताज किंवा कोरड अन्न खा,आणि संरक्षित आच्छादित ठेवा. उकळलेले किंवा क्लोरीनमिश्रित पाणी प्या. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हवा संसर्गविरोधी फवारे वापरा.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मा.महेश वडदकर यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.